दि . ७ ( पीसीबी ) – काँग्रेसची साथ उद्धव ठाकरेंनी सोडायलाच हवी. आणि राज ठाकरे भाजपसोबत गेलेच नाही कधी. भाजप विरहित, काँग्रेस विरहित शिवसेना ही महाराष्ट्राची गरज आहे. तेवढे ते हुशार आहे. महाराष्ट्रातील जनतेमध्ये, कार्यकर्त्यांच्या मनात काय भावना आहे हे त्यांना माहीत आहे. एकत्र आल्यावर त्यांचं कॅडर काय ठरवतं. मतदारांना तर दोघे एकत्र यावं वाटतं. दोघांनी येऊन शिवसेना अभेद्य होणार नाही. एकनाथ शिंदे यांचीही शिवसेना एकत्र आली पाहिजे. ही शिवसेना असेल ती महाराष्ट्रातील निवडणुकीत मग लोकसभा असो किंवा विधानसभा असो यात ती सिकंदर होईल असे गजानन कीर्तिकर म्हणाले.
पुढे ते म्हणाले, मिठाचा खोडा अदृश्य शक्ती टाकत आहेत. मी त्यांचं नाव घेत नाही. शिवसेना एकसंघ व्हावी, म्हणजे भविष्यात आपल्याला धोका आहे. हा धोका ज्यांना वाटतो ते मिठाचा खडा टाकतात. मी त्यांचं नाव घेत नाही आता. अदृश्य आहे. मी आज नाव घेत नाही. अदृश्य शक्ती आहे. त्यांचे मनसुबे आहेत. पूर्ण ताकदीने आपण सत्तेत असावं. जेव्हा शिवसेना विभाजित राहिली तरच ते शक्य होईल. त्यामुळे शिवसेना एकत्र येऊ नये असे मनसुबे असणारच काही लोकांचे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना तळमळीनं सांगेल एकत्र या. तुम्ही दोघे तरी एकत्र या. भविष्यात एकनाथ शिंदे यांना सोबत आणण्याचा प्रयत्न करेल. ऐकणं न ऐकणं हे त्यांचं काम आहे. मी ज्येष्ठ आहे. त्यामुळे त्यांना मी बोलू शकतो असे ही ते म्हणाले.











































