तेली समाजाचा पिंपरी चिंचवड शहरात हुंडा विरोधी येलगार

bpcauthor bpcauthor
4 Min Read

पिंपरी, दि.२
संताजी सेवा प्रतिष्ठान च्या वतीने तेली समाजाचा पिंपरी चिंचवड शहरात हुंडा विरोधी येलगार

समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन हुंडा विरोधी तसेच लग्नातील अनिष्ठ व नवीन आरूढ होत चाललेल्या प्रथे विरुद्ध एकत्र येऊन आपल्या पिंपरी चिंचवड शहरात तसेच राज्यभर विविध माध्यमातून लढा देण्याचे ठराव पास करण्यात आला.
संपूर्ण राज्यभरातील तेली समाजातील काम करणाऱ्या सर्व संघटना राजकीय नेते, समाजातील कार्यकर्ते मान्यवर तसेच वधुवर मेळावा आयोजित करणाऱ्या सर्व संघटना याना प्रत्येक्ष भेटून पत्राद्वारे किंवा आव्हान द्वारे हुंडा विरोधी तसेच लग्नातील अनिष्ठ व नवीन आरूढ होत चाललेल्या प्रथे विरुद्ध हि चळवळ उभी करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
याची सुरवात महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड शहरातील संताजी सेवा प्रतिष्ठान व प्रदेश तेली महासंघ द्वारे आज दिनांक १जून २०२५ रोजी करण्यात आली. क्रांतिवीर चाफेकर चौकातील क्रांतिवीर चाफेकर यांच्या पुतळ्यासमोर तेली समाजातील मान्यवर, संताजी सेवा प्रतिष्ठान चे तसेच प्रदेश तेली महासंघ पदाधिकारी कार्यकर्ते इत्यादींनी एकत्रित जमून शपथ घेण्यात आली. यामध्ये समाजातील महिलांची व मुलींची संख्या लक्षणीय होती.
या प्रसंगी वैष्णवी ताई हगवणे यांना समाज्याच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

या पूर्वी श्री मोरया इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल हेल्थ सायन्स, चिंचवड येथे संताजी सेवा प्रतिष्ठान आज दिनांक ०१/०६/२०२५ रोजी असा जाहीर ठराव करत आहे की समाजातील लग्न सोहळा अनिष्ट प्रकार थांबविण्यासाठी चळवळ उभी करत आहे. या मध्ये खालील विषयांवर समाजातील मान्यवरांच्या सहमतीने तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि सभासद यांच्या सहमतीने आणि उपस्थितीत खालील निर्णय घेण्यात आले.
१. तेली समाजातील लग्न सोहळ्यात हुंडा या प्रथेला विरोध करून हि प्रथा बंद करणे तसेच हुंडा मागितल्यास तेथे लग्नास नकार देण्याचा निर्णय घेणे.
२. तेली समाजातील लग्न सोहळ्यामध्ये रुखवता मध्ये महागड्या वस्तू मुलीकडून न मागणे.
३. लग्न सोहळा शक्य तितका साध्या पद्धतीने आणि कर्ज काढून न करणे.
४. मोठ्या व खर्चिक लग्न सोहळ्याचे अनुकरण टाळणे.
५. लग्न वेळेत लावणे.
६. लग्नात अनावश्यक भाषणबाजी तसेच सत्कार सोहळे कमी करणे.
७. एकूणच लग्न सोहळ्यातील खर्च शक्य तितका कमी करने.
८. सोहळ्या मधील रिटर्न गिफ्ट प्रथा बंद करणे.
९. हुंडा मागणाऱ्या तसेच घेणाऱ्या कुटुंबाला समाजाच्या वतीने योग्य ती समज देणे.

अश्या नवीन सामाजिक नियमांची अंबलबजावणी करण्यासाठी समाजातील अनेक संघटना राजकीय मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते इत्यादींची मदत घेणे. संपूर्ण राज्यात या बाबत चळवळ उभी करणे.
वरील ठरावास संताजी सेवा प्रतिष्ठान तसेच प्रदेश तेली महासंघ मंडळ इत्यादींनी पाठिंबा तसेच अनुमोदन दिले.
वरील शपथ ग्रहण समारंभास तसेच आयोजित मीटिंग साठी समाजाचे खालील मान्यवर उपस्थित होते .

सौ. डॉ.सरोज गणेश अंबिके (अध्यक्ष) संताजी सेवा प्रतिष्ठान. श्री.बाळासाहेब गेनू शेलार. (संस्थापक)
सौ. जिजा रामचंद्र वंजारी (सेक्रेटरी) संताजी सेवा प्रतिष्ठान श्री.राजेश विश्वास डोंगरे.(उपाध्यक्ष – प्रदेश तेली महासंघ)
श्री.रोहिदास पडगळ (खजिनदार) संताजी सेवा प्रतिष्ठान श्री.मनोज अणेकर.(प्रकल्प प्रमुख – संताजी सेवा प्रतिष्ठान)
श्री.नरेंद्र रंगनाथ मेहेर. श्री.विश्वास हरिभाऊ डोंगरे.(विश्वस्थ -श्री संताजी महाराज श्री.प्रदीप चंद्रकांत सायकर पालखी सोहळा मंडळ), श्री .राजाराम वंजारी. सौ. वैशालीताई आतकर. (मा. अध्यक्ष – वधुवर मेळावा)
डॉ. गणेश माधवराव अंबिके. श्रीमती. मनीषा राजेंद्र किर्वे. (अध्यक्ष – संताजी महाराज उत्सव)
श्री. पी. टी. चौधरी समिती २०२६- सुदुंबरे)
श्री विठल सायकर, सुनील बाळकृष्ण देशमाने सौ. लता विश्वासराव डोंगरे. (माजी अध्यक्ष – वधुवर मेळावा)
श्री. सुधाकर केशवराव लोखंडे. सौ.आरती स्वप्नील विभुते.
श्री. अमोल हरिभाऊ देशमाने सौ.पूजा आकाश कापसे.
श्री. गजानन रामचंद्र सायकर. सौ.सुवर्णा विजय आतकर
श्री. गोविंद ब. चौधरी. सौ.देवश्री सचिन चौधरी.
श्री. भरत दशरथ चौधरी. सौ.वैशाली प्रवीण चौधरी.
श्री. अशोक लक्ष्मण कल्याणकर. सौ.स्वाती पिंगळे.
श्री. प्रीतम ज्ञानेश्वर किर्वे. सौ.शीतल महेश वंजारी.
श्री. वरद गणेश अंबिके. कु. रोहिणी आतकर.
श्री.महेश लालजी वंजारी आदी सहभागी झाले होते.

Share This Article