वैष्णवी हागवणे मृत्यू प्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करा: जिजाऊ ब्रिगेड ची मागणी

0
7

पिंपरी,दि . २३ ( पीसीबी ) : वैष्णवी हागवणे च्या शरीरावर मारहाणीचे अनेक वळ आढळले असल्यामुळे ही केवळ आत्महत्या नसून हा खूनाचा प्रकार असण्याची शक्यता आहे.त्या मुळे पोलिसांनी सर्व बाजूंनी निष्पक्ष चौकशी करून आरोपींवर कडक कारवाई करावी.हुंडा बळी, खून , आत्महत्येस प्रवृत्त करणे या सारखी कडक कलमे लावून आरोपींवर गुन्हे दाखल करावेत.वैष्णवी हागवणे यांची जाऊ मयुरी यांचा ही छळ करून त्यांना घराबाहेर काढले आहे.त्यांनी सुद्धा छळाची तक्रार महिला आयोग व पोलीसांकडे या पूर्वीच केली आहे.या कडे दुर्लक्ष करून कारवाई न करणारांची चौकशी करून त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी पुणे जिल्हा जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने करण्यात आली.सदर मागणीचे निवेदन शुक्रवार दि.23 रोजी जिजाऊ ब्रिगेड च्या पुणे जिल्हाध्यक्षा मनिषा हेमबाडे , सचिव वृषाली साठे , उपाध्यक्षा शितल घरत, विभागीय अध्यक्षा सुनिता शिंदे यांनी दिले.सदर निवेदन आयुक्तांच्या वतीने सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांनी स्वीकारले. या प्रसंगी मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, आबासाहेब ढवळे, अशोक सातपुते , वैभव जाधव, दत्तात्रय कांगळे उप