पिंपरी, दि . २३ ( पीसीबी )- शहर विकास आराखड्यातील जाधववाडी क्षेत्रावरचे आरक्षण उठवण्यासाठी मी शेतकऱ्यांच्या बरोबर आहे, असा विश्वास भोसरी विधानसभेचे भाजप आणदार महेश लांडगे यांनी आज व्यक्त केला.
चिखली-कुदळवाडीच्या जाधववाडी परिसरात तब्बल १७५ एकरावर सर्वात मोठे आरक्षण टाकण्यात आले आहे. तीन महिन्यांपूर्वी ४५०० अनधिकृत पत्राशेड आणि बांधकामे पाडून परिसर भुईसपाट करण्यात आला. पाठोपाठ विकास आराखड्यात ९० टक्के क्षेत्रावर आरक्षण टाकण्यात आल्याने भुमिपूत्र हबकले. या विषयावर गेल्या आठवड्यापासून आज दुसरी बैठक निमंत्रीत करण्यात आली होती.
श्री संत सावतामाळी मंदिरामध्ये श्री क्षेत्र टाळगाव चिखली मधील ग्रामस्थांची मीटिंग पार पडली. यामध्ये खऱ्या अर्थाने महत्त्वाचा विषय म्हणजे नवीन डीपीमध्ये एसएसीसी हे आरक्षण टाकण्यात आले आहे. एकूण १७५ एकरावरच्या या आरक्षणामुळे जाधववाडी कुदळवाडी, रोकडे वस्ती, आहेरवाडी मधील विविध भागातील मूळ शेतकरी हे भूमिहीन होणार आहेत. या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित बैठक घेतली. शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विरोध दर्शवला.
भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे यांना त्या ठिकाणी ग्रामस्थांनी निमंत्रीत केले. स्वतः आमदार त्या ठिकाणी आले आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मी शेतकऱ्यांच्या दोन पावलं पुढं असेल अशी ग्वाही त्यांनी दिली. आरक्षण उठवण्यासंदर्भात मी नक्कीच शेतकऱ्यांना पाहिजे ती मदत करेल. भूमीहीन शेतकऱ्यांना पुन्हा त्यात जमिनी रहिवासी झोन मध्ये कशा मिळतील यासाठी प्रयत्न करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यामध्ये मोठ्या प्रमाणात भूमिहीन शेतकरी त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ टाळगाव चिखलीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते