अटकेनंतरही राजेंद्र हगवणेचा माजोरडेपणा कायम

0
8

दि . २३ ( पीसीबी ) – महाराष्ट्राला हादरवणाऱ्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे गेल्या सात दिवासांपासून फरार होते. आज (23 मे) सकाळी पहाटे 4.30 वाजता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली.

अटकेनंतरही राजेंद्र हगवणेचा माजोरडेपणा कायम असल्याचं दिसून आलंय. बावधन पोलीस ठाण्यात राजेंद्र आणि त्याचा मुलगा सुशील यांच्या मुसक्या आवळून पोलिसांनी सकाळी आणलं, तेव्हा पत्रकारांनी पश्चात्ताप होतो का? असा सवाल विचारला. त्यावर नकारार्थी आणि उद्दामपणे हात हलवत राजेंद्र हगवणेने नकार दिला. आपल्या छळाला, मारहाणीला कंटाळून तरूण सुनेने आत्महत्या केली. त्याबाबत कोणतीही पश्चात्तापाची भावना सोडा, उलट उद्दामपणाच करताना राजेंद्र हगवणे दिसत होता.

राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंच्या अटकेनंतर पोलीसांच्या रेकॉर्डनूसार एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजेंद्र हगवणे गेल्या 7 दिवसांत कुठे कुठे फिरला, याबाबत माहिती समोर आली आहे. गेल्या 7 दिवसांत वेगवेगळ्या गाड्या बदलत राजेंद्र हगवणे फिरत होता. त्यामुळे राजेंद्र हगवणेंच्या या प्रवासावरुन अनेक प्रश्न निर्माण होत आहे. 17 मे रोजी जर राजेंद्र हगवणे औंध जिल्हा रुग्णालयात गेला होता. तर त्याला त्यावेळी त्याला अटक का झाली नाही?, असा प्रश्न उपस्थित होतोय. तसेच राजेंद्र हगवणे 22 मे रोजी पुन्हा पुण्यात परतल्याचं पोलीस रेकॉर्डद्वारे समोर आलं आहे.

वैष्णवी हगवणे हिने शुक्रवारी (16 मे) राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले. तिच्या चारित्र्यावरून बोलणं वैष्णवीला सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं चालू केलं होतं. पती, सासू-सासरे, नणंद, दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळ करून कुर वागणूक दिली. पोस्ट मार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते