हगवणे यांचा मटण पार्टीचा व्हिडीओ समोर

0
10

दि . २३ ( पीसीबी ) – वैष्णवी हववणेच्या मृत्यूने अख्खा महाराष्ट्र रडतोय तर दुसरीकडे सासरा म्हणजेच राजेंद्र हगवणे यांचा मटण पार्टीचा व्हिडीओ समोर आला आहे. गेल्या सात दिवसांपासून हगवणे भीतीपोटी फरार होते. दरम्यान, आज त्यांना आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे.

राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे गेल्या सात दिवासांपासून फरार होते. आज (23 मे) सकाळी पहाटे 4.30 वाजता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे गेल्या सात दिवसांपासून कुठे लपून बसले होते.

दरम्यान, हगवणे नेमकं कुठे होते असा प्रश्न विचारला जात असताना हगवणे यांचा एका व्हिडीओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 17 मे रोजी या आरोपींनी तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये जेवण केले. तळेगाव दाभाडे येथील तांबडा पांढरा रस्सा हॉटेलमध्ये त्यांनी मटणावर ताव मारला. हगवणे यांची कृती पाहून समाज माध्यमांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.