भाजपचे जे काही मतदारसंघ आहेत तिथे मी देखील लक्ष घालेल – अजित पवार यांचा इशारा

0
8

बारामती, दि. २३ –
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अजित पवार यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. या निवडणुकीत भाजपचे जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष तानाजीराव थोरात यांनी उडी घेऊन चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अजित पवार यांच्या पॅनलने सर्व २१ जागांवर विजय मिळवला होता. मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात अजित पवार यांनी गुरुवारी सभा घेतली. या सभेतून थेट भाजपला इशारा दिला. भाजपचे जे काही मतदारसंघ आहेत. तिथे देखील माझे कार्यकर्ते आहेत. मी देखील त्या मतदारसंघात लक्ष घालेल, असे अजित पवार यांनी म्हटले.

अजित पवार यांनी आपल्या भाषणात मतदारांचे आभार मानत सांगितले की, छत्रपती सहकारी साखर कारखाना ऊस दर कमी असताना देखील निर्विवाद बहुमत दिले. बारामतीमधील सभासदांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत आम्ही बाहेर काढला. ज्या गोष्टी मी ठरवतो ते पूर्ण करतो त्या कामासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावतो.

छत्रपती सहकारी साखर कारखान्यात मिळालेल्या विजयानंतर अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी अजित पवार यांनी रंजन तावरे यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, काही जण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगत होते, निवडणूक लावा. परंतु मी देखील महायुतीमधील छोटा घटक आहे. काही जणांना चैन पडत नव्हते उठले की मुंबईत येत होते. निवडणूक लावा असे मुख्यमंत्री यांना सांगत होते.

भारतीय नौदलाच्या तीन व्हिडिओनंतर पाकिस्तानच्या हृदयाचे ठोके वाढले, आता पाकिस्तानने पुन्हा धाडस केल्यास निशाण्यावर ही ७ ठिकाणे
माळेगाव साखर कारखाना 15 लाख साखर मेट्रिक टन विक्रमी उत्पादन झाले. सुरवातीला पवार साहेब यांनी 1991 नंतर मला संधी दिली. त्या संधीचे सोने करण्याचे काम मी करीत आहे. मी माझ्यासमोर कुणीही असेना माळेगाव साखर कारखान्यात पॅनल उभा करणार आहे. तसेच प्रचाराचा नारळ फोडताना चेअरमन कोण असणार? हे देखील सांगेल, असे अजित पवार यांनी म्हटले.