थेरगाव येथील वेंगसरकर अकॅडमी येथे झालेल्या साडे आठ कोटींच्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करा – रमेश वाघेरे

0
6

पिंपरी, दि. 22
– 
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या थेरगाव येशील दिलीप वेंगसरकर अकॅडमी येथे महापालिकेच्चा विद्युत विभागाने गरज नसताना स्टेडियम मध्ये सुमारे साडे आठ कोटी रुपये खर्चून ‘हाय मास्ट, एल,ई.डी. दिवे बसवले सदर कामामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्याची संपूर्ण चौकशी करुन विद्युत विभागाचे तत्कालिन सह. शहर अभियंता बाबासाहेब गलबले, आणी विद्युत विभागाचे विद्यमान सह. शहर अभियंता संजय खाबडे यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात यावी. अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश नानासाहेब वाघेरे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्याची प्रत पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यालय, राज्य माहिती आयुक्त कार्यालय यांच्या कडे रवाना केली आहे.

थेरगाव येथील दिलीप वेंगसरकर अकॅडमी मध्ये राज्यस्तरीय, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने खेळले जात नाहीत, तेथे फक्त खेळाडूंना क्रिकेटचे प्रशिक्षण दिले जाते. महापालिकेच्या विद्युत विभागाने साडे आठ कोटी रुपये खर्च करून हायमास्ट, एल ई डी दिवे बसविण्यात आले असून ते बसवण्यासाठीचे स्ट्रक्चर एका खांबा साठी बारा लाख रुपये असे चार खांबांसाठी तब्बल ४८ लाख रुपये खर्च केले आहेत. काही दिवसांपूर्वी दिलीप वेंगसरकर यांनी भेट दिली असता त्यांच्या हे निदर्शनास आले की अतिशय निकृष्ट दर्जाच्या लाइट्स बसवण्यात आले आहे. उभारण्यात आलेल्या विद्युत खांब आणि लाइट्स चा खर्च स्थानिक माजी नगरसेवकांकडून ऐकून दिलीप वेंगसरकर अवाक् झाले मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर ६ कोटीत संपूर्ण विद्युत व्यवस्था केली असून ती इथल्या पेक्षा सरस आहे असे वेंगसरकर यांनी बोलून दाखवले.

थेरगाव येथील क्रिकेट ग्राउंड हे दिलीप वेंगसरकर अकॅडमी ने भाडेतत्त्वावर घेतले असून हा खर्च अकॅडमी ने करणे अपेक्षित असताना हा खर्च विद्युत विभागाच्या या दोन्ही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे महापालिकेच्या माथी मारला गेला आहे आणि गरज नसताना करदात्या नागरिकांचे साडे आठ कोटी रुपयांची उधळपट्टी केली आहे. फक्त स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठीच हे केलं आहे असे दिसून येते. त्यामुळे बाबासाहेब गलबले आणि संजय खाबडे यांच्या पगार आणि मालमत्ता जप्त करून हे पैसे वसूल करण्यात यावेत. नाही तर आयुक्त साहेब आपल्या विरोधात न्यायालयात दाद मागावी लागेल तरी आपण सखोल चौकशी करून लवकरात लवकर या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता रमेश वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.