दि . २२ ( पीसीबी ) – वैष्णवी हगवणे यांचं नऊ महिन्यांचं बाळ आज कस्पटे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. बाणेर हायवेजवळ अज्ञाताने बाळ सोपवल्याची माहिती वैष्णवीच्या कुटुंबीयांनी दिली. वैष्णवी हगवणेंच्या मृत्यूनंतर तिच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घरी आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते, बाळाचा ताबा कस्पटे कुटुंबियांना भेटत नव्हता. ते बाळ निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे होते. मात्र, आता अखेर त्या बाळाचा ताबा कस्पटे कुटुंबियांना मिळाला आहे.
वैष्णवी हगवणेंच्या मृत्यूनंतर तिच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घरी आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. तसेच वैष्णवीचं बाळ हे ना हगवणे कुटुंबियांकडे होतं, ना कस्पटे कुटुंबियांकडे होतं. ते वैष्णवीच्या नवऱ्याच्या मित्र असलेल्या निलेश चव्हाण यांच्या घरी होतं. त्यानंतर वैष्णवीचे काका बाळाला घेण्यासाठी निलेश चव्हाण यांचं घर गाठलं. परंतु यावेळी दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. त्यानंतर काहीवेळेतच कस्पटे कुटुंबियांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि बाणेरच्या हायवेजवळ येऊन तुमचे बाळ घेऊन जा…असे सांगितले. त्यानंतर वैष्णवीचे काका बाणेरच्या हायवेजवळ गेले आणि त्यांना 9 महिन्यांचे बाळ सुपुर्द केले. आता ही अज्ञात व्यक्ती कोण होती?, याची माहिती घेतली जात आहे.
सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार असून, त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान वैष्णवी हगवणे हिने तिला नेमका काय जाच झाला हे स्वतःचं एका मैत्रिणीकडे सांगितलं होतं. त्याची ऑडिओ क्लिप एबीपी माझाच्या हाती लागली आहे. आई-वडिलांना विरोध करुन शशांक सोबत प्रेम विवाह केला, ही माझी आयुष्यातील मोठी चूक होती. आता ही चूक सुधारण्यासाठी वडील माझी साथ देणार आहेत, लवकरचं मी घटस्फोट घेणार आहे, असं वैष्णवीने मैत्रिणीकडे सांगितलं होतं, पण तत्पूर्वीच वैष्णवीवर टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आली, या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.