दि . २१ ( पीसीबी ) – पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी नवल किशोर राम यांची नियुक्ती झाली आहे. या पूर्वी ते पुण्याचे जिल्हाधिकारी होते आणि आता ते पंतप्रधान कार्यालयात कार्यरत होते. ते ३१ मे रोजी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारतील. नवल किशोर राम हे एक अनुभवी प्रशासक आहेत आणि त्यांनी यापूर्वी पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांचे कामकाज आणि अनुभव लक्षात घेऊन पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यातील नागरिक त्यांच्याकडून चांगले कामकाज आणि विकासाची अपेक्षा व्यक्त करत आहेत.