आख्खी जाधववाडी डिपीने खाल्ली

0
10
  • तब्बल १७५ एकराच्या महाआरक्षणामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – तीन महिन्यांपूर्वीच बांगलादेशी घुसखोरांच्या नावाखाली अतिक्रमण कारवाईमुळे कुदळवाडी परिसरातील नागरिकांचे कंबरडे मोडले असतानाच टीपी स्किमचे भूत मानगुटावर बसले होते. ग्रामस्थांनी कडवा विरोध करून ते पळवून लावले, तोच आता त्याच पंतक्रोशितील जाधववाडी अडचणीत आली आहे. १६ मे रोजी जाहीर झालेल्या नवीन शहर विकास आराखड्यात (डिपी) संपूर्ण जाधववाडी, रोकडे वस्ती अगदी रिव्हर रेसिडन्सी पर्यंतच्या १७५ एकर क्षेत्रावर म्हणजे ७ लाख १० हजार ९०० चौरस मीटर परिघात
सुपर एडमिनिस्ट्रेटीव्ह कम कमर्शियल कॉम्पलेक्स (एसएसीसीसी) अर्थात भव्य प्रशासकीय व व्यापार संकुलाचे महाआरक्षण टाकण्यात आले आहे. आर म्हणजे निवासी आरक्षणाचे शासकिय कार्यालय आणि व्यापार संकुल असे आरक्षण टाकण्यात आल्याने गावकरी संतापले आहेत.

विकास आराखड्यात हे आरक्षण क्रमांक ५/२५५ ए, बी, सी, डी, ई तसेच ५ / २५६ ए, बी, सी, डी, ई, एफ आणि
५/२३३ जाधववाडी असे आहे. जे क्षेत्र या आरक्षणात येते त्याचे सर्व्हे क्रमांक 15 (p), 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 34, 35, 39, 40, 41, 41, 42, 43, 44, 45, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 75, 76(1), 76(2), 115, 116, 117, 118, 119, 157, 158, 159, 160, 161, 167, 168, 169, 170, 171, 172, 173, 174, 176, 177, 178, 178, 179, 179, 180, 180, 181, 181, 182, 182, 183, 183, 184, 184, 185, 185, 186, 186, 187, 187, 188, 188, 189, 189, 190, 190, 191, 191, 192, 192, 193, 193, 194, 195, 196, 197, 197, 198, 199, 200, 201, 202, 203, 204, 205, 206, 207, 208, 209, 210, 211, 212, 213, 213, 214, 215, 216, 217, 218, 221, 222, 223, 223, 224, 224, 225, 225, 226, 226, 227, 228, 229, 230, 231, 232, 233, 234, 235, 236, 237, 238, 239, 240, 241, 242, 243, 244, 245, 246, 247, 256, 257, 258, 259, 262, 263, 264, 265, 266, 267, 268, 275, 276, 277, 278, 279, 345, 350, 351, 352, 353, 354, 355, 356, 357, 358, 396, 398, 420 असे आहेत.

जाधववाडीच्या बैठकित संतापाची लाट
विकास आराखड्यात जाधववाडीत सर्व जमीन महाआरक्षणात टाकल्याने सर्व भूमिपुत्रांनी एकत्र येत तीव्र नाराजी व्यक्त केली. माजी महापौर राहुल जाधव यांच्या नेतृत्वाखाली पाचशेवर ग्रामस्थ उपस्थित होते. चिखली गावामध्ये महानगरपालिका प्रशासनाने लादलेल्या नवीन डीपी प्लॅन संदर्भात संपूर्ण ग्रामस्थांनी श्री संत सावता माळी जाधववाडी मंदिरावरती तातडीची महत्वाची बैठक घेऊन डीपी प्लॅन संदर्भात तीव्र विरोध नोंदवला आहे
उपस्थितांमध्ये माजी महापौर राहुल जाधव यांच्यासह उदय पाटील, संतोषतात्या जाधव, जितूभाऊ यादव, विशालभाऊ आहेर, एडवोकेट विशाल जाधव, विकास साने, सामाजिक कार्यकर्ते विशाल बालघरे, रविशेठ जाधव आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

आम्ही एक इंचही जमीन देणार नाही. जोवर आरक्षण निघत नाही तोवर हा लढा सुरूच ठेवणार आहोत. जुन्याच डिपीतील आरक्षणे अगोदर विकसीत करता आलेली नाहीत त्यात आता हे मोठे आरक्षण टाकून आम्हाला भुमिहिन करण्याचा डाव आहे. यापूर्वी टेल्को, रेडझोन, एमआयडीसी, प्राधिकरणात गेल्यात. अनेक ठिकाणी बाधित झाल्या आहेत. त्यामुळे १०० टक्के स्थानिक शेतकऱ्यांचा या आरक्षणाला विरोध आहे. गाव जी भुमिका घेणार त्यांच्याबरोबर आहोत, असे राहुल जाधव यांनी सांगितले.
ते म्हणाले, आमच्या जमिनी थोड्याच आहेत. मुळात आरक्षणाचा हेतु समजला नाही, त्याचे कारण काय, त्याचा मोबदला काय मिळणार तेसुध्दा समजलेले नाही. आमचे निवासी आहे ते निवासीच राहु द्या, आम्ही आमचे विकसीत करू. यापूर्वी लोक अज्ञानी होते, आता शिकलेले आहेत. अनेक बिल्डर, आर्किटेक्ट आहेत, असे सर्वांनी ठणकावून सांगितले.