दि . १४ ( पीसीबी ) – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि खासदार सुनिल तटकरे यांची सदिच्छा भेट घेतली. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून, या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मन:पूर्वक स्वागत केले.
या भेटीत रोहित शर्मांच्या योगदानाचा गौरव करताना उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी त्यांचे कौतुक केले व देशासाठी दिलेल्या त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल आभार व्यक्त केले. रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक ऐतिहासिक विजयांची नोंद केली. या आठवणींना उजाळा दिला.
रोहित शर्मा यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या अनुभवाचा आगामी पिढ्यांना लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.