शत्रुघ्न काटे यांची निवड सर्वार्थाने योग्य _राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

0
4

दि . १४ ( पीसीबी ) – पिंपरी चिंचवड: भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी ज्येष्ठ नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) स्वागत केले आहे. काटे यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना आशीर्वाद दिले.
शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शत्रुघ्न काटे यांनी सर्वप्रथम संघाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी अखंड भारत मातेच्या प्रतिमेला वंदन करून पुष्पहार अर्पण केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंतराव हरहरे आणि पिंपरी चिंचवड जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे यांनी पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन काटे यांचे अभिनंदन केले याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समन्वय समितिचे सर्व प्रमुख पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.
यावेळी बोलताना हेमंतराव हरहरे आणि नरेंद्र पेंडसे यांनी शत्रुघ्न काटे यांची निवड योग्य असल्याचे सांगितले. काटे यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी काटे यांना आशीर्वाद दिले.
शत्रुघ्न काटे यांच्या निवडीचे पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले आहे.