सर्वोच्‍च न्यायालय आदेश व अल्पसंख्याक आयोग यांच्या आदेश येईपर्यंत धार्मिक स्‍थळावर कारवाई नाही

0
8

महापालिका आयुक्त शेख सिंग यांच्या सोबत सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन

पिंपरी, दि.13 ( पीसीबी )
नवीन धार्मिक स्‍थळांच्‍या परवानगीला कोणत्‍याही प्रकारची अडचण आणणार नाही. मात्र ज्‍या धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याबाबत नोटिस देण्यात आली आहे. त्या धार्मिक स्थळांवर सर्वोच्‍च न्‍यायालयाचा व अल्पसंख्याक आयोगाच्या सूचनेप्रमाणे पुढील आदेश येईपर्यंत कारवाई होणार नाही, अशी ग्वाही पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्‍त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली, अशी माहितीक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट वाहतूक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अजिज शेख यांनी दिली.

शहरातील धार्मिक स्‍थळांवरील कारवाईबाबत महापालिका प्रशासनाने नोटिस बजाविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शेखर सिंग यांच्या सोबत सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन महापालिकेत करण्यात आले होते. या वेळी आयुक्‍त शेखर
सिंह यांनी आश्‍वासन दिले. या वेळी आरपीआय आठवले गटाच्‍या वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिज शेख, कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष, बाळासाहेब भागवत, रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष फजल शेख, अल्पसंख्याक अध्यक्ष युसुफ कुरेशी, काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक अध्यक्ष शाबुद्दीन शेख, नियाज देसाई, रशीद सय्यद, गुलाम रसूल, आदीसह राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, मुख्य अभियंता मकरंद निकम, पोलिस उपायुक्त शिवाजी पवार, सहायक पोलिस आयुक्त सचिन हिरे, पिंपरी पोलिस निरिक्षक वनिता धुमाळ, चिखली पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, साहेब पोलीस निरीक्षक अतुल शेटे, व संदीप पाटील, पांडुरंग जाधव,आशिष गायकवाड, आदीसह अधिकारी उपस्थित होते.

अजिज शेख यांनी प्रसिद्धीपत्रकात माहिती दिली की, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कुदळवाडी परिसरामध्ये नुकतीच मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण कारवाई करण्यात आली. त्‍यानंतर या भागातील धार्मिक स्थळांनाही नोटीसा देण्यात आल्या आहेत. अनधिकृत धार्मिक स्‍थळे हटविण्यात येणार असल्‍याचे महापालिकेने सांगितले आहे. या कारवाईला शहरातील अनेक सामाजिक संघटनांनी विरोध दर्शविला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने यापुर्वी आंदोलनही करण्यात आले होते. यावेळी महापालिका प्रशासनाला लेखी मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते.

या संदर्भात महापालिका आयुक्तांनी बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. नवीन धार्मिक स्‍थळांना नियमातूनच परवानगी देण्यात येणार असल्‍याचे सांगण्यात आले. डीपी प्लॅनमुळे सध्या सर्व ठिकाणी परवानग्या थांबवण्यात आल्‍या आहेत. डीपी प्लॅन मंजूर झाल्यानंतर परवानगीला सुरुवात करण्यात येईल, असे आयुक्त सिंह म्‍हणाले, अशी माहिती अजिज शेख यांनी दिली.