आधी अश्लील व्हिडीओ पाठवले, नंतर ब्लॅकमेल केलं; नेमकं काय घडलं?

0
6

दि . १३ ( पीसीबी ) – दिवसेंदिवस सोशल मीडियाचा गैरवापर वाढताना दिसुन येत आहे. पुण्यातील लोणी काळभोर येथे राहणाऱ्या एका तरुणीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून तसेच अश्लील व्हिडिओ तयार करून ते पाठवून ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आला आहे. ब्लॅकमेल करत तिचे अश्लील व्हिडीओ पाठवत 50 हजार रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार मे महिन्यात घडला आहे. आरोपीने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून त्यावरून पीडितेला अश्लील व्हिडीओ पाठवले. त्यानंतर त्याने तरुणीला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत 50 हजार रुपयांची मागणी केली.

तसेच पीडित तरुणीच्या मनात लज्जा निर्माण होईल असे गैरवर्तन करत तिला शिवीगाळ केली. असे दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिस या आरोपीवर काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.