अजित पवार गटाच्या पक्षाचे शहराध्यक्षावर बनावट कागदपत्रांसाठी गुन्हा दाखल

0
3

दि . १२ ( पीसीबी ) – अजित पवार गटाच्या पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्यावर बनावट कादगपत्रे सादर करुन पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष असलेल्या शंतनू कुकडेला काही महिलांच्या तक्रारीनंतर बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अनेकांचा सहभाग आढळून आल्याने पोलीसांनी शंतनू कुकडे याच्या बँक खात्यांची पडताळणी केली. त्यावेळी शंतनू कुकडे आणि दिपक मानकर यांच्यात एक कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचे आढळून आले होते.

दावा खोटा ठरवत बनावट कागदपत्र सादर
पोलिसांनी याबाबत दिपक मानकर यांना चौकशीला बोलावलं असता त्यांनी शंतनू कुकडे सोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचा दावा केला होता. यावेळी त्यांनी पुरावा म्हणून पोलिसांकडे काही कागदपत्र सादर केली होती. परंतु ही सादर केलेली कागदपत्राची पोलिसांन पडताळणी केली असता ती कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर दिपक मानकरच्या विरोधात बनावट कागदपत्रे सादर करुन पोलीसांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक मानकर यांच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपुर्वी वादग्रस्त शंतनू कुकडे प्रकरणात देखील दीपक मानकर यांची चौकशी झाली होती . आता बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने जमीन व्यवहार केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात काही दिवसांपूर्वी एका परदेशी महिलेवरती लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शंतनू कुकडे याला अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान शंतनू कुकडे याच्या बँक खात्यावरुन कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले होते. आरोपी शंतनू कुकडेचा जवळचा सीए रौनक जैन याच्या बँक खात्यामधून मानकर पिता-पुत्राच्या बँक खात्यामध्ये पावणेदोन कोटी रुपये आल्याची माहिती आहे.

दरम्यान, पोलिस तपासात कुकडेच्या बँक खात्यात 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम पोलिसांना आढळून आली . त्यातील 40 ते 50 कोटी रुपये काहीच्या बँक खात्यावर पाठवण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. मात्र, दीपक मानकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. रौनक जैन याच्या बँक खात्यातून आमच्या बँक खात्यात पैसे आले आहेत. आमचा एका जमिनीचा व्यवहार आहे. तो रौनक याच्या सोबत झाला. त्याची कायदेशीर इसार पावती देखील झालेली आहे. शंतनू कुकडे याचे वैयक्तिक जीवन आणि त्याचे आर्थिक व्यवहार याच्याशी आमचा काहीही संबंध नाही, असे दीपक मानकर यांनी म्हटले होते.