आदर्श शिक्षक बाबुराव भिलारे यांचे निधन

0
6

दि . ८ ( पीसीबी ) – सातारा जिल्ह्यातील आदर्श शिक्षक बाबुराव रामचंद्र भिलारे (वय-८५) यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, दोन मुले, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पिंपरी चिंचवड शहर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जेष्ठ पदाधिकारी सुरेश वाडकर यांचे ते सासरे होत.
महाबळेश्वर तालुक्यातील अवकाळी (मेट-गुताड) गावचे ते रहिवासी होते. गेली अनेक वर्षे सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे ते अध्यक्ष होते. भिलारे गुरुजी म्हणून त्यांची मोठी ख्याती होती. सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता.