ऑपरेशनसिंदूर सुरु व्हायच्या फक्त ४-५ तास आधी

0
6

दि . ८ ( पीसीबी ) – हा फोटो प्रसिद्ध लेखक आणि माझा मित्र विक्रम संपथने शेअर केलेला आहे. #ऑपरेशनसिंदूर सुरु व्हायच्या फक्त ४-५ तास आधी काढलेला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एबीपी लाईव्ह समिट या कार्यक्रमासाठी आले होते तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या लोकांशी त्यांच्या गप्पा झाल्या तेव्हा काढलेला. विक्रम म्हणतो की ’पंतप्रधान आमच्यापैकी सर्वांशी अगदी निवांत गप्पा मारत होते. आमच्यापैकी अनेकांना नावानिशी हाक मारत आणि आमच्या घरच्यांची खबरबात घेत’. विक्रम म्हणतो की ‘कितीही मोठं संकट समोर असलं तरी त्यांच्या चेहऱ्यावर चिंता, तणावाचा लवलेशही नव्हता आणि ही वृत्ती खरंच आत्मसात करण्यासारखी आहे!’

पाच तासांनी काय होणार आहे हे पंतप्रधानांना पूर्ण माहिती होतं, त्यांची टीम त्यांना मिनिट टू मिनिट अपडेटही देत असणार तरीही पंतप्रधान अजिबात विचलित न होता, त्यांच्या नेहमीच्या धीरगंभीर, तरीही नर्मविनोदी शैलीत ह्या समिट मध्ये एक तास बोलले, #ऑपरेशनसिंदूर लाँच व्हायच्या फक्त चार-पाच तास आधी, कार्यक्रमा नंतर इतर पाहुण्यांना भेटले, बोलले पण चेहेऱ्यावर तणाव नाही, आवाजात बदलाव नाही, देहबोलीत नेहमीचाच आत्मविश्वास.

त्यांच्या एका तासाच्या भाषणात भारताच्या जलसंपत्तीचा वापर फक्त भारतानेच करावा असा एक उल्लेख सोडता पाकिस्तानचा कुठेही रेफरन्स देखील नव्हता आणि त्यासाठी अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या अनेक तथाकथित विचारवंतांनी त्यांना खूप ट्रोलही केले होते, कारण पाच तासात काय घडणार आहे हे पंतप्रधानांना माहिती होते, पण त्यांच्या टीकाकारांना माहिती नव्हते. विक्रम लिहितो की ‘कार्यक्रम संपवून आम्ही हॉटेलवर गेलो आणि रात्री उशिरा, देशाच्या नागरी आणि लष्करी नेतृत्वाने संयुक्तपणे आखलेल्या #ऑपरेशनसिंदूरची अंमलबजावणी, जी केवळ योग्य वेळेच्या प्रतीक्षेत होती — ती झाल्यानंतर आम्हाला कळलं.’

खरंच कुठल्या मातीचे घडले असतील मोदीजी? त्यांना पूर्ण माहीती होतं की रात्री काय घडणार आहे. मिशन यशस्वी होईपर्यंतचा तणावही असेलच. १२० कोटी भारतीयांच्या आशा #ऑपरेशनसिंदूर वर केंद्रित आहेत हेही त्यांना माहिती होतं. तरीही लोकांमध्ये वावरताना त्यांच्या चेहऱ्यावर तणावाची एकही रेघ नव्हती, आणि आवाजात जराही घालमेलीचा सूर नव्हता.

जेव्हा एक नेता देशाच्या सुरक्षेच्या अशा निर्णायक क्षणी, इतकी मोठी जबाबदारी स्वतःच्या खांद्यांवर पेलत असतानाही इतक्या संयमाने, धीरगंभीर सहजतेने आणि करुणेने वागत असतो, तेव्हा त्याचे निर्णय किती खोल आणि दूरदृष्टीने घेतले गेले असतील याची कल्पना करा. सोपं नाहीये हे, सत्तेचा, जबाबदारीचा काटेरी मुकुट डोक्यावर असताना इतकं सहज वावरणं, कुठेही क्षणभरासाठी देखील तोल सुटू न देणं.

ऑपरेशनसिंदूर नंतर मी मोदींच्या भाषणाचा व्हिडियो पूर्ण परत पाहिला. ना एकदाही त्यांचे शब्द थरथरले, ना नजर झुकली, ना चेहेऱ्यावर चिंता झळकली, पण त्यांची स्थीर तरीही धारदार नजर पाहिली तेव्हाच जाणवतं त्या नजरेत असलेलं मूक आश्वासन,

एक नि:शब्द प्रतिज्ञा — “ये देश नहीं झुकने दूंगा”.

एक ही हृदय है मोदीजी, कितनी बार जितोगे?

अभिमान वाटतो मला आणि माझ्यासारख्या असंख्य भारतीयांना की आज भारताचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे, कणाहीन नेभळट मनमोहन सिंग नाही, मर्कटचाळे करणारा मुजोर राहुल गांधी नाही, वाकड्या तोंडाने रोज खोटं बोलणारा सदैव भावी साडेतीन जिल्हे सम्राट नाही.

नशीबवान आहोत आपण भारतीय. असं नेतृत्व जगात फार थोड्या देशांना लाभतं.

शेफाली वैद्य