दि. १ ( पीसीबी ) –विधानसभेला पक्ष सोडून उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेत गेले आणि पराभव झाल्यावर पुन्हा भाजपमध्ये आलेल्या एकनाथ पवार यांना भाजप पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष निवडणूक प्रक्रीयेत महत्वाचे स्थान दिल्याबद्दल जेष्ठ कार्यकर्ते महेश कुलकर्णी यांनी कठोर शब्दांत सडकून टीका केली आहे. कुलकर्णी यांच्या पोस्टवर भाजपमध्ये खळबळ असून प्रदेश भाजपनेही त्यांची गंभीर दखल घेतल्याने पवार यांची अडचण झाली आहे.
आगामी महापालिका निवडणूक विचारात घेता पिंपरी चिंचवड शहरा भाजप अध्यक्षपद कोणाला द्यावे यावर प्रचंड मतभेद झाले. आमदार सोडून निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी द्या, समोर अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तोंड देऊ शकेल असा तगडा अध्यक्ष द्या, स्थानिक मंडळींचा प्रभाव असल्याने गाववालाच पाहिजे तर दुसरीकडे ओबीसींना न्याय द्या असे अनेक मतप्रवाह होते. एकमत होत नसल्याने गुप्त मतदान झाले आणि २६ प्रमुख सदस्यांनी पसंती क्रमांक १,२,३ नुसार मतदान केले. दरम्यान, मतदानाचा अधिकार एकनाथ पवार यांना देण्यावरून तीव्र मतभेद झाले होते. महेश कुलकर्णी यांच्या सारख्या सर्वात जेष्ठ निष्ठावंताला डावलले म्हणून वाद झाले. यावेळी निरीक्षक अलेले आमदार सिध्दार्थ शिरोळ आणि आमदार अमित गोरखे यांनी त्यावर तोडगा काढला आणि वाद मिटला. याच मुद्यावर कुलकर्णी यांनी एकनाथ पवार यांच्याबद्दल तिखट शब्दांत एक पोस्ट फेसबूकला शेअर केली आणि खळबळ उडाली. अनेक निष्ठावंतांनी कुलकर्णी यांच्या मताशी सहमती दर्शविली आहे.
महेश कुलकर्णी यांचे ती फेसबूक पोस्ट आम्ही जशी आहे तशी देत आहेत…. कुलकर्णी म्हणतात –
पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार…
भारतीय जनता पक्षात सर्व उपभोगुन स्वःताच्या महत्वकांक्षेपायी पक्षाच्या नेतृत्वावर त्यांनी शिव्यांची लाखोली वाहिली. उबाठा सारख्या पक्षात जाऊन तिकीट मिळवत विधानसभा निवडणुक लढवली. पराभव झाल्यानंतर परत घरवापसीसुध्दा केली. अशा एकनाथ पवारांना आज अध्यक्षपदासाठी मतदान करण्याकरता आपल्यामधील नतद्रष्टांनी स्वःताच पायघड्या अथरल्या आणि त्यांचे नाव मतदान यादीत आणले. त्याला प्रत्युत्तर देत काही पक्षावर प्रेम करणाऱ्या नेत्यांनी आक्षेप घेत पवारांचे नाव वगळले आणि त्यांच्या मतदानालाच हरकत घेतली. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.
हे स्पष्टपणे लिहिले अशासाठी की, कै. अंकुश लांडगे यांच्या काळात त्यांना पक्षातुन हकालपट्टी करण्यात पुढे असणारेच अंकुशराव गेल्यानंतर पवारांशी हातमिळवणी करत मनपामध्ये पदे मिळवली. त्यांनीच पक्षाचा क्रायटेरिया बदलत नविन धोरणानुसार पवार यांचे नाव मतदान यादीत आणले, हे अंत्यत खेदजनक आहे. पण पक्षात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासारखे नेते आहेत. पाटील यांच्याच कानाला लागुन पक्षातील प्रामाणिक व निष्ठेने काम करणाऱ्यांवर सुड भावनेने याला का बोलावले, असेही अनेकांना वाटले. आपल्या घरातील मुलांच्यासाठी विचारधारा राबवणाऱ्या नेत्यासोबत राहुन, गरीब आणि पैसा आहे का, असे बघणाऱ्या कार्यकर्त्यांना वाटाण्याच्या अक्षदा लावणार, याला तर म्हणतात पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणीहार या न्यायाने वागणारा.
खरे तर, हे लिहिण्याचे कारण असे की, एकनाथ पवारांना आम्ही पक्षातून काढले होते. ते महेश कुलकर्णी यांनी वाचवले असे बोंबलत होते. त्यांनीच हे उद्योग करत पायघड्या घालण्याचे काम केले. व पक्षातील काहींना मतदानासाठी रोखले. मुख्यमंत्र्याबद्दल जातीभेद करतात, असा आक्षेप घेत पक्ष सोडणाऱ्या विरुद्ध कडक भुमिका घेतली. त्याबद्दल आ. सिद्धार्थ शिरोळे व आ. अमित गोरखे , मोरेश्वर शेडगे , विलास मडिगेरी व अन्य कार्यकर्त्याचे मःनपुर्वक अभिनंदन.
- महेश कुलकर्णी