समरसता साहित्य परिषदेची नूतन कार्यकारिणी जाहीर

0
7

पिंपरी,दि. १ ( पीसीबी ) – समरसता साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी मानसी चिटणीस तसेच कार्यवाहपदी जयश्री श्रीखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समरसता साहित्य परिषद प्रदेश कार्यकारिणीचे सहकार्यवाह आणि पिंपरी – चिंचवड शाखेचे निमंत्रक सुहास घुमरे यांनी मे २०२५ ते एप्रिल २०२७ या कालावधीसाठी सदरहू कार्यकारिणीची नियुक्ती जाहीर केली असून सविस्तर कार्यकारिणी खालीलप्रमाणे आहे.

अध्यक्ष – मानसी चिटणीस
कार्यवाह – जयश्री श्रीखंडे
सहकार्यवाह – नीलेश शेंबेकर
सहकार्यवाह – हेमंत जोशी
कोषाध्यक्ष – राजेंद्र भागवत

सदस्य – उज्ज्वला केळकर, समृद्धी सुर्वे, सुरेश जोशी, श्रद्धा चटप, पुष्कर भातखंडे, हरिष मोरे, सुहास देशपांडे, स्वाती भोसले, स्नेहा पाठक, सौरभ शिंदे

सल्लागार – पंजाबराव मोंढे, मीना पोकरणा, मंगला पाटसकर, कैलास भैरट

मार्गदर्शक – शोभा जोशी आणि बाळासाहेब सुबंध

समरसता साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेच्या वतीने प्रतिवर्षी विद्यार्थी साहित्य संमेलन, काव्यमैफल करंडक, कवितेकडून कवितेकडे हा विशेष उपक्रम आणि मासिक साहित्य संवाद या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.