पिंपरी चिंचवड दि.३० (प्रतिनिधी)
महान संत, हिंदू धर्मातील जातीव्यवस्था आणि वाईट चालीरिती निर्मुलनासाठी संघर्ष करणारे थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीदिनी अक्षयतृतिया बुधवार दि. ३० एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता पिंपरी चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे निगडी येथील महात्मा बसवेश्वर उद्यान परिसरातील मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल, जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, समरसता गतिविधिचे सोपान कुलकर्णी, सुहास देशपांडे,दानेश तिमाशेट्टी, सचिन राऊत,महेंद्र बोरकर, गुरुराज कुंभार आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते, याप्रसंगी महात्मा बसवेश्वरांच्या महान कार्याचे स्मरण करण्यात आले.