पिंपरी, दि. २६ : रोटरी क्लब ऑफ आकुर्डीच्या वतीने खेड तालुक्यातील कोयली येथील श्री भानोबा विद्यालयातील मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली. त्याचबरोबर श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, बऊर येथे विज्ञान प्रयोगशाळा आणि मावळ तालुक्यातील निगडेतील प्रतिक विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान व संगणक प्रयोगशाळा उभारल्या आहेत. या प्रकल्पाचे नुकतेच लोकार्पण झाले.यासाठी कंपन्यांनी सीएसआरनिधीची मदत केली.
शेंडोंग कंपनीचे संचालक झोंग लेई, रोटरी क्लब ऑफ आकुर्डीचे अध्यक्ष गौतम शाह यांच्या हस्ते स्वच्छतागृहांचे उद्घाटन झाले.
या कार्यक्रमास शेंडोंग कंपनीचे उपाध्यक्ष गुरुनाथ कुलकर्णी, अशीता चौहान, तसेच रोटरी क्लबच्या सचिव कल्याणी कुलकर्णी, विनीत कुलकर्णी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक शिरीष शेलके, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. शाळेच्यावतीने मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. या प्रकल्पामुळे २८५ विद्यार्थ्यांना लाभ होणार असून प्रकल्पाचा एकूण खर्च आठ लाख ५० हजार रुपये आहे.
खेड तालुक्यातील कोयली येथील श्री भानोबा विद्यालयातील मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली. यासाठी शेंडोंग कंपनीने सीएसआर निधीतून सहकार्य केले.
रोटरी क्लब ऑफ आकुर्डीने सीएसआर भागीदार विलो माथेर अँड प्लॅट पंप्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, बऊर येथे विज्ञान प्रयोगशाळा आणि प्रतिक विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालय, निगडे (ता. मावळ) येथे विज्ञान व संगणक प्रयोगशाळा उभारल्या आहेत.या दोन्ही प्रयोगशाळांचे उद्घाटन अध्यक्ष गौतम शाह, सचिव कल्याणी कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विनीत कुलकर्णी, बऊर शाळेचे प्राचार्य गाभणे सर आणि निगडे शाळेचे प्राचार्य श्री. मांडे सर उपस्थित होते. दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत एकूण ६५० विद्यार्थ्यांना लाभ होणार असून एकूण खर्च पाच लाख ५० हजार रुपये इतका आहे.