श्री. सुनील काकडे महावितरणच्या पुणे परिमंडल मुख्य अभियंतापदी रुजू

0
5

पुणे, दि. २५ -महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून श्री. सुनील काकडे यांनी शुक्रवारी (दि. २५) कार्यभार स्वीकारला. याआधीचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांची संचालक (मानव संसाधन) म्हणून थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. त्यांच्या रिक्त जागी भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. काकडे यांची पुणे येथे बदली झाली आहे.

मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे मूळचे छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे. विद्युत अभियांत्रिकीचे पदवीधर असलेले श्री. काकडे १९९७ मध्ये तत्कालिन म. रा. विद्युत मंडळामध्ये सहायक अभियंता म्हणून रूजू झाले. सन २००६ मध्ये थेट भरती प्रक्रियेमधून त्यांची कार्यकारी अभियंता पदी निवड झाली. या पदावर त्यांनी चाळीसगाव, नाशिक, भुसावळ, छत्रपती संभाजीनगर येथे काम केले. तर २०१७ पासून पदोन्नतीने अधीक्षक अभियंता म्हणून त्यांनी कल्याण, अहिल्यानगर, भांडूप येथे काम केले. श्री. काकडे यांची डिसेंबर २०२२ मध्ये मुख्य अभियंता म्हणून पदोन्नती झाली. ते भांडूप परिमंडलात कार्यरत होते. आता पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून त्यांची बदली झाली आहे.

पुणे परिमंडलामध्ये ‘इझ ऑफ लिव्हिंग’नुसार तत्पर ग्राहकसेवा तसेच सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्यासोबतच महावितरणच्या महसूलवाढीला सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल, असे मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे यांनी सांगितले.