पिंपरी, दि. २३ : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील बैसारन व्हॅलीत 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर पिंपरी-चिंचवड येथील 32 पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले आहेत. ज्यात रावेत आणि चिंचवड परिसरातील रहिवासी आहेत. आता त्यांच्याकडून मदत ही मागितली जात आहे.
द रेसिस्टन्स फ्रंट (TRF) या लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हल्लेखोरांनी हिंदू पर्यटकांना लक्ष्य केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. या हल्ल्यामुळे पहलगाम आणि आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण आहे. अडकलेल्या पर्यटकांच्या गाड्या स्थानिक प्रशासनाने सुरक्षा कारणास्तव जप्त केल्या असून, पुढील आठ दिवस त्या सोडल्या जाणार नाहीत, असे सांगण्यात आले आहे.
पहलगाममधून दहशतवादी हल्ल्याचा व्हिडीओ समोर, क्षणातच धडाधड गोळ्या आणि…
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू
यामुळे पर्यटक भयभीत झाले असून ते लवकरात लवकर सुरक्षित घरी परतण्यासाठी प्रशासनाकडे मदतीची मागणी करत आहेत. सध्या सर्व पर्यटक सुखरूप असले, तरी त्यांच्यावर मानसिक दबाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीत परतल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत बैठक घेतली. आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण बघायला मिळतंय. दहशतवाद्यांविरोधात कडक पाऊस उचलण्याची मागणी केली जात आहे.