दि . २३ ( पीसीबी ) – सोन्याचा भाव सध्या गगनाला भिडला आहे. सोन्याचा दर आता पुन्हा एकदा वाढला आहे. सोन्याने मंगळवारी प्रति 10 ग्रॅमसाठी एक लाख रुपये किमतीचा टप्पा ओलांडला. सोन्याची किंमत 1 लाखांपर्यंत जाणार, असा अंदाज याआधी वर्तवण्यात आला होता. देशातील विविध शहरांमधील सोन्याचा दर किती आहे, ते जाणून घेऊयात.
देशातील विविध शहरांमधील 1 ग्रॅम (24 कॅरेट) सोन्याचा भाव
- दिल्ली – 10,150 रुपये प्रति 1 ग्रॅम
- नोएडा – 10,135 रुपये प्रति 1 ग्रॅम
- गुडगाव – 10,135 रुपये प्रति 1 ग्रॅम
- मुंबई – 10,135 रुपये प्रति 1 ग्रॅम
- चेन्नई – 10,135 रुपये प्रति 1 ग्रॅम
- बंगळुरु – 10,135 रुपये प्रति 1 ग्रॅम
- कोलकाता – 10,135 रुपये प्रति 1 ग्रॅम
सोन्याचा भाव
गुडरिटर्न्सनुसार, 22 एप्रिलला 22 कॅरेट सोन्याचा भाव 90,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 98,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) आज सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा दर 96,670 रुपये होता. तर 23 कॅरेटचा भाव 96,282 रुपये होता. याशिवाय 22 कॅरेट सोन्याचा भाव 88,550 रुपयांवर आहे. IBJA वरील माहितीनुसार, सध्या 18 कॅरेट सोने 72,503 रुपयांना तर 14 कॅरेट सोने 56,552 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने विकले जात आहे. जीएसटी आणि इतर शुल्कांचा या दरामध्ये समावेश नाही. या शुल्कांमुळे सोन्याच्या दरात फरक पडेल.चांदीचा दर
सोन्यासोबत चांदीचाही दर वाढला आहे. यापूर्वी चांदी 1 लाख 5 हजार रुपयांपर्यंत पोहोचली होती. त्यानंतर चांदीच्या दरामध्ये घसरण जाणवली. गेल्या काही दिवसांमध्ये चांदीचा दर वारंवार वाढत आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा सध्याचा भाव 1,01,000 रुपये इतका आहे.सोन्याचा भाव वाढल्यामुळे त्याची झळ सर्वसामान्यांना बसणार आहे. जगभरातील तज्ज्ञांनी सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल, असा दावा केला होता. ट्रम्प यांच्या धोरणामुळे सोन्याच्या दरात बराच फरक पडला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 3,400 डॉलर/औंसवरून थेट 3,430 डॉलरपर्यंत पोहोचली. डॉलरच्या किंमतीत घसरण, डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण, फेडरल रिझर्व्हचा वाद या सगळ्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. अक्षय तृतीयेला सोन्याचा भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.