उद्योजकाच्या लेकाचा जीव गेला, १२ लाखांच्या बाईकचा चेंदामेंदा, ७० हजारांच्या हेल्मेटचा चुराडा

0
7

कोल्हापूर : वेगाने रस्त्यावर दुचाकी चालवत प्रवास करणे कोल्हापुरातील एका रायडरच्या जीवावर बेतलं आहे. आजरा आंबोली राष्ट्रीय महामार्गावर देवर्डे ते माद्याळ तिट्टादरम्यान झालेल्या मोटरसायकल व चार चाकीच्या अपघातात कोल्हापूर येथील टाकाळा परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय रायडर सिद्धेश विलास रेडेकर याचा मृत्यू झाला आहे. या अपघातात बारा लाखांच्या रायडर गाडीचा चक्काचूर झाला असून ७० हजारांचे हेल्मेटचे अक्षरश: तुकडे झाले आहे. तसेच, हेल्मेटवरील कॅमेराही तुटला आहे.

कोल्हापुरातील एका कॉलेजमध्ये आर्किटेक्चर शिक्षण घेणारा सिद्धेश रेडेकर हा आपल्या चार मित्रांसमवेत काल सकाळी आंबोली येथे रायडिंगसाठी गेला होता. त्याच्यासोबत त्याचे ४ मित्र फरहाद खान ( रा.रुईकर कॉलनी ), नितांत कोराणे ( रा. रंकाळा अंबाई टॅंक ), अमेय रेडीज ( रा.नागळा पार्क सर्व रा. कोल्हापूर ) आपल्या गाडीने आले होते. ते सकाळी ६ नंतर कोल्हापुरातून रायडिंगसाठी निघाले आणि आंबोलीत येऊन त्यांनी घाटातील विविध ठिकाणी फोटोसेशनही केले. सिद्धेश रेडेकर याला मोटरसायकल रायडिंग व फोटोग्राफीची आवड होती. सकाळी ११ नंतर ते कोल्हापूरकडे जाण्यास निघाले. यावेळी देवर्डे माद्याळ दरम्यानच्या वळणावर कोल्हापूरहून सावंतवाडीकडे जाणाऱ्या तवेरा गाडी आणि सिद्धेशच्या गाडीचा जोराची धडक झाली.

हा अपघातात इतका भीषण होता की सिद्धेशच्या डोक्यावरील ७० हजार रुपयाचा हेल्मेट आणि त्यावर असलेला कॅमेरा रस्त्याच्या कडेला तुटून पडला आणि मोठा आवाज झाला. त्याच्या हाताला, छातीला व डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रस्त्यावरील नागरिकांनी त्वरीत त्याला आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं आणि प्राथमिक उपचार करून गडहिंग्लज येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला असल्याचं त्याच्या मित्रांनी सांगितल.

कुख्यात गुंड टिपू पठाणची धिंड काढली! आम्ही तुमच्यासोबत, पुणे पोलिसांचं नागरिकांना आवाहन

या अपघाता संदर्भात आजरा पोलिसात ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आला असून तवेरा गाडीचा चालक विजय अरविंद पाटील ( रा.यादवनगर कोल्हापूर ) याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अपघातस्थळी रायडिंगसाठी घेतलेली सिद्धेशच्या बारा लाखांच्या गाडीचा चक्काचूर होवून पडली होती. तर रायडिंगसाठी वापरले जाणारे ७० हजारांचे हेल्मेट व कॅमेराही पडला होता.