दि . २२ ( पीसीबी ) – पिंपरी चिंचवड महापालिकेतील निवृत्त कार्यकारी अभियंता डॉ. ज्ञानदेव रामचंद्र (वय ५९) जुंधारे यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. थेरगाव य़ेथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. डॉ. झुंधारे गेल्यावर्षी सेवानिवृत्त झाले होते. अत्यंत प्रामाणिक, मितभाषी, अभ्यासू आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. अभियांत्रिकी मध्ये पीएचडी करणारे महापालिकेतील ते पहिलेच अभियंता होते. मंगळवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी कोळपेवाडी (ता. प्रवरानगर) अहिल्यानगर येथे त्यांच्यावर अंत्यासंस्कार कऱण्यात आले.