मुंबई, दि. २१ – सिनेमांमध्ये दिसणारे कलाकार प्रेक्षकांवर बरेचदा प्रभाव टाकत असतात. आपला आवडता कलाकार जसं करतो तसंच आपण सुद्धा अनुकरण करायचं अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा असते. त्यामुळेच ते या कलाकारांना सोशल मीडियावर बरेच फॉलो करत असतात. नुकतीच अशाच एका लोकप्रिय अभिनेत्री बाबत धक्कादायक माहिती तिच्या सोशल मीडियामुळे समोर आली आहे.
नागराज मंजुळे यांच्या सुपरहिट आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या फॅन्ड्री या सिनेमातून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री राजेश्वरी खरात तिच्याबाबत एक खळबळ जनक माहिती पुढे आली आहे. फॅन्ड्री मधून राजेश्वरी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. त्यानंतर सुद्धा ती बऱ्याच प्रोजेक्टमध्ये दिसलेली. राजेश्वरी अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. जे बरेचदा चर्चेचा विषय देखील बनतात. पण आता राजेश्वरीची एका भलत्याच कारणामुळे चर्चा चालू असून चाहते ही तिच्यावर नाराज आहे.
अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला ज्यामध्ये ती पाण्यात हात जोडून उभी आहे. आणि कॅप्शनमध्ये तिने बाप्तिस्मा स्वीकारल्याचं सांगितले. तसेच आणखी एका पोस्टमध्ये तिने काही ग्रुप फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ख्रिश्चन धर्मवासीय तिच्यासोबत पोज देतायत. या फोटोंमध्ये तिने कॅप्शन लिहिले की, कारण तुमच्यासाठी माझ्या योजना मला माहित आहेत असे प्रभू म्हणतात… पुढे तिने बाप्तिस्मा , नवीन सुरुवात, आयुष्य, प्रेम, राजेश्वरी खरात, ईस्टर असे हॅशटॅग दिले आहेत