स्व’त्व जपले तरच कुटुंब व्यवस्था टिकेल – माननीय राज्यपाल राजेंद्र अर्लेकर

0
7

निगडी दि.२०
“आपण आपले स्वत्व विसरलो त्यामुळे कुटुंब व्यवस्था धोक्यात आली आहे, येणाऱ्या पिढीला संस्कारित करण्याची जबाबदारी ही कुटुंबप्रमुखांची आहे आपले स्व’त्व जपून, स्व जागरण करून आपण कुटुंब व्यवस्था मजबूत केली पाहिजे”, असे प्रतिपादन केरळ राज्याचे माननीय राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी केले. ते निगडी प्राधिकरण येथील सि. एम.एस. शाळेत आयोजित कुटुंब संगम कार्यक्रमात बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.एन.जी.सी चे महासचिव सी.पी.राजू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीसह सिंबोईसिस इन्स्टिट्यूट ऑफ आय टी च्या संचालक डॉ. धन्या प्रमोद, नवोदया चे अध्यक्ष डॉ.बिजू पिल्लई, टी.पी.विजयन प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले “पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती होती त्यामुळे नकळत संस्कार होते होते कालांतराने परिस्थिती बदलली त्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे.
परिवर्तन आधी माझ्यात झाले पाहिजे मग कुटुंबात आदर्श व्यवहार होतील,शिक्षण पद्धतीत बाहेरील आक्रमणे झाले त्यामुळे संस्कार कमी झाले. केवळ मेकॉले ला दोष देऊन उपयोग नाही तर आमचाही तेवढाच दोष आहे कारण आम्ही स्वत्व विसरलो त्याचे पुनर्जीवन झाले पाहिजे.
Learning English ऐवजी learning in english झाले त्यामुळे भाव, विश्व बिघडले
पिढी नशेच्या अधिन झाली आहे,
त्यांचेकडे लक्ष दिले पाहिजे.
वसुधैव कुटुंबम चा उल्लेख करून कुटुंबाने संस्कार व मानवता जपली पाहिजे.
प्रमुख अतिथी मुकुंद कुलकर्णी यांनी प्रत्येक कुटुंबाने एकत्रित भोजन केले पाहिजे व राष्ट्रीयतेची भावना जपण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक डॉ. बिजू पिल्लई यांनी तर आभार उन्नीकृष्णन यांनी मानले. कार्यक्रमापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रम झाले, कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, शाळेतील पालक, परिसरातील कुटुंब, आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी उपस्थिती लावली.

पंतप्रधानांचे युवा पिढीवर लक्ष

विकसित भारताचे लक्ष साध्य करण्यासाठी भक्कम समाजाभिमुख कुटुंब उभे करणे व त्यातील युवा पिढी कडे लक्ष देऊन नशामुक्त सशक्त युवक घडविण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केल्याचा उल्लेख राज्यपालांनी केला.