केरळचे राज्यपाल आज शहरात; कार्यक्रमाचे आयोजन

0
23

पिंपरी, दि.२०
नवोदया, पुणे आयोजित कुटुंब संगम कार्यक्रमाच्या निमित्याने केरळ राज्याचे माननीय राज्यपाल महोदय श्री.राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर पिंपरी चिंचवड शहरात येत आहेत.
नवोदया तर्फे आयोजित कुटुंब संगम कार्यक्रम आज रविवार दि.२० एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता सी एम एस शाळा मैदान, संभाजी चौक प्राधिकरण निगडी येथे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला एस एन जी एस चे महासचिव सी.पी.राजू , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी, सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ आयटी चे संचालक डॉ.धन्या प्रमोद यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहावे असे आवाहन नवोदया संस्थेने केले आहे.