पिंपरी, दि. १९ पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर भालेराव (वय – ६५) यांचे दिर्घ आजाराने आज शनिवारी सकाळी साडेनऊ वाजका निधन झाले. त्यांच्या मागे माजी नगरसेविका पत्नी प्रतिभा भालेराव, दोन मुले, सूना, नातवंडे तसेच एक मुलगी, जावई असा परिवार आहे. दुपारी चार वाजता निगडी येथील अमरधाम स्मशानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी कळविले आहे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती, अध्यक्ष तसेच महापालिका गटनेते या महात्वाच्या पदांवर त्यांनी काम केले होते. भालेराव हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक होते. त्यांची अत्यंत स्पष्टवक्ता अशी ओळख होती, रोखठोक कार्यशैली होती.
सुतार समाज संघटित करण्यासाठी विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज महासंघाची स्थापना करून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले.संपूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधव एकत्र जोडण्याचे प्रभावी कार्य केले आहे.