दि . १७ ( पीसीबी ) – गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या अनेक घटनांनी बीड महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आले आहे. दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, बंदुकीचा धाक, धाकदपट, किरकोळ कारणातून मारहाण अशा घटनांनी गुन्हेगारीच्या टोकावर जाऊन थांबलेल्या बीड जिल्ह्यात चिकन विक्रीच्या वादातून अल्पवयीन मुलाला उचलून सिमेंटच्या नाल्यावर आदळल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. केज शहरातील या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून घडलेल्या या घटनेतील आरोपीही अल्पवयीन आहे. रेहान कुरेशी असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन आरोपीचा शोध घेतला जात आहे.
चिकन विक्रीच्या वादातून एका अल्पवयीन मुलाला त्याच्याच शेजारी चिकन विक्रीचे दुकान असलेल्या मुलाने उचलून सिमेंटच्या नाल्यावर आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटना केज मध्ये घडली असून रेहान कुरेशी असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणात केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अल्पवयीन आहे.तर याचा पोलिस अधिक तपास करत आहेत.चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याने केज तालुक्यात खळबळ उडाली आहे.दरम्यान अल्पवयीन आरोपीचा शोध केज पोलिस घेत आहेत. केज शहरात चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. रेहान कुरेशी नावाच्या अल्पवयीन मुलाचं दुसऱ्या एका अल्पवयीन मुलाशी वाद झाला. हा वाद वाढत गेला आणि आरोपीने रागाच्या भरात रेहानला उचलून थेट सिमेंटच्या नाल्यावर आपटलं. डोक्याला गंभीर मार लागल्याने रेहानचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याचा शोध घेतला जात आहे.