माजी आमदाराच्या नातवाचे अकस्मात निधन

0
73

पुणे, दि. १५ : शिरुर तालुक्याचे माजी आमदार सुर्यकांत ऊर्फ काकासाहेब पलांडे यांच्या नातवाचे अकस्मात निधन झाले. शर्विन ऊर्फ चिकू (वय २०) यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. ते कोकण भवन येथील उपायुक्त संजीव पलांडे यांचे सुपुत्र होते.सोमवारी मुंबई येथे अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शर्विन यांचे बालपण आणि शिक्षण मुंबईत झाले. लहानपणापासूनच ते अभ्यासात हुशार होते. सध्या ते वकिलीचे शिक्षण घेत होते. रविवारी मुंबईत त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, एक बहीण, आजी, आजोबा, आत्या, मामा असा परिवार आहे.