मोठी बातमी! देशातील सर्व टोलनाके १५ दिवसात बंद होणार

0
16

दिल्ली – आपल्याला एखादा लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असल्यास एखादातरी टोल नाका लागतोच आणि तिथे टोल द्यावा लागतो. पण काही ठिकाणी वाहनाच्या रांगा लागल्याचे चित्र सगळीकडे दिसते. पण आता ही चिंता मिटणार आहे. कारण सरकार लवकरच नवे धोरण आणणार आहे.सुरळीत प्रवास आणि वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दिशेने केंद्र सरकारच्या रस्ते व वाहतूक मंत्रालयाच्या वतीने विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे आता टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागणार नाही. टोल नाक्यावर आता सॅटेलाईट द्वारे टोल रक्कम वसूल केली जाणार आहे. जीपीएस प्रणालीद्वारे हे सर्व केले जाणार आहे. यासंदर्भात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले आहे. नितीन गडकरी म्हणाले की, पुढील १५ दिवसांत देशभरात एक नवीन उपग्रह-आधारित टोल वसुली धोरण सुरू केले जाईल. या प्रणाली अंतर्गत, वाहनांना आता टोल प्लाझावर थांबण्याची आवश्यकता राहणार नाही. त्याऐवजी, प्रगत ट्रॅकिंग तंत्रज्ञानाचा वापर करून उपग्रह इमेजिंगच्या आधारे टोल शुल्क आपोआप कापले जाईल. लांबच्या लांब लागणाऱ्या रांगा बंद करणे. इंधन वाचवणे आणि राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवासाचा वेळ कमी करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. दरम्यान येत्या एक एप्रिलपासून प्रत्येक टोल नाक्यावर फास्टॅग लावणे अनिवार्य करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.नवीन टोल धोरण लागू होणार असून यामुळे वाहनधारकांना ५० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. तसेच, नागरिकांसाठी ३ हजार रुपये वार्षिक पास उपलब्ध करून दिला जाणार आहे, ज्याद्वारे देशभरातील सर्व महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर अमर्यादित प्रवास करता येणार आहे.