पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये हिंसाचार, ४०० लोक घर सोडून पळाले

0
34

– हिंदू असुरक्षितच- सुवेंदू अधिकारी
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारादरम्यान १२ जणांना अटक करण्यात आली असून, अटक करण्यात आलेल्यांचा आकडा १५० च्या पुढे गेला आहे. मुस्लिमबहुल जिल्ह्यांतील हिंदूंना प काढावा लागत असून राज्य सरकारने त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. भारतीय जनता पक्षाने मुख्यमनातरी ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान सीमा सुरक्षा दलाच्या पाच तुकड्या तैनात केल्यानंतर हिंसाचार आटोक्यात आल्याचे सांगितले जात आहे.

केंद्र सरकारने नुकत्याच पारित करून घेतलेल्या वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याविरोधात देशातील काही भागात विरोध होत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने जाळपोळ, दगडफेक करत सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच या हिंसाचारादरम्यान, तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुर्शिदाबादमध्ये परिस्थिती तणावपूर्ण असून, या हिंसाचारावरून भाजपने राज्यातील ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच येथील भयावह परिस्थितीमुळे अनेक हिंदू कुटुंब पलायन करत आहेत, असा आरोपही केला आहे.

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील काही भागात मागच्या काही दिवसांपासून वक्फविरोधात हिंसक विरोध आंदोलने होत आहेत. यादरम्यान, हिंसक जमावाने शनिवारी (दि. १२) पिता-पुत्रासह तीन जणांची हत्या केल्याचे समोर आले आहे. हे पिता-पुत्र हिंदू-देवी देवतांच्या मूर्ती घडवायचे अशी माहिती समोर आली आहे, दरम्यान, हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी बीएसएफच्या आठ कंपन्या आणि सुमारे एक हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये डीजींपासून ते एएसपी स्तरापर्यंतच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यादरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात नवा वक्फ बोर्ड सुधारणा कायदा राज्यात लागू केला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी बंगालमध्ये हिंदू सुरक्षित नसल्याचा आणि परिस्थिती खूपच गंभीर असल्याचा आरोप केला आहे.

मुर्शिदाबाद हिंसाचारावरून विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी दावा केला की, धार्मिक कट्टरतावाद्यांच्या भीतीमुळे पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील धुलियन क्षेत्रामधून ४०० हून अधिक हिंदूंनी आपले घर सोडणे भाग पडले आहे. भयग्रस्त कुटुंबांनी नदी पार करून माल्दा जिल्ह्यातील बैष्णवनगर येथील देओनापूर-सोवापूर ग्रामपंचायत क्षेत्रामधील ग्रामपंचायत क्षेत्रातील लालपूर हायस्कूलमध्ये आश्रय घेतला आहे. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी दावा केला आहे की, हिंसाचारानंतर ४०० हून अधिक लोकांना आपले घर सोडून पळावे लागले आहे.बंगाल सरकारवर टीका करताना त्यांनी म्हटले की, तृणमूल काँग्रेसचे ‘तुष्टीकरणाची राजकारण’ हिंदूंच्या जीविताला धोकादायक बनत आहे. भाजप नेत्यांनी त्या भागातील काही फोटो आणि व्हीडीओही शेअर केले आहेत, ज्यामध्ये काही विस्थापित नागरिकांचे मुलाखतीही समाविष्ट होत्या. एका व्यक्तीने असा आरोप केला की त्याचे घर पेटवून दिले गेले आणि घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी काहीही न करता तिथून पळून गेले.

परिस्थिती चिघळलयास आणखी तुकड्या मागवणार

दक्षिण बंगाल फ्रंटियरचे महानिरीक्षक कर्णीसिंह शेखावत यांनी सांगितले की, बीएसएफ राज्य पोलिसांशी समन्वय साधून या भागात शांतता प्रस्थापित करण्याचे काम करत आहेत. गरज भासल्यास आणखी तुकड्या पाठवण्यात येतील. आपण या परिस्थितीत राज्य पोलिसांबरोबर काम करणे आवश्यक आहे. यासंदर्भात चर्चा झाली आहे. आम्ही आमच्या पाच तुकड्या पोलिसांच्या मदतीसाठी पाठवल्या आहेत. आमचे काम स्वतंत्र कारवाई करण्याचे नसून, पोलिसांना मदत करणे हे आहे. राज्य पोलिसांच्या मागणीनुसार आम्ही कारवाई करू. लवकरच येथे शांतता प्रस्थापित होईल, अशी आशा आहे. पोलिसांना आणखी कंपन्यांची गरज भासल्यास, आम्ही ती उपलब्ध करून देऊ. बीएसएफ सर्व परिस्थितींना सामोरे जाण्यास तयार आहे,असे त्यांनी स्पष्ट केले.

या भागात उसळला हिंसाचार

मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बहरामपूर, जंगीपूर आणि मालदा दक्षिण हे वेगवेगळे भाग संसदीय क्षेत्रात येतात. हिंसा धुलिया, समसेरगंज आणि सुतीमध्ये उसळली आहे. सुती जंगीपूर आणि धुलिया व समसेरगंज मालदा दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा भाग आहेत. जंगीपूर जागेवर टीएमसीचा ताबा आहे. येथून खलीलुर रहमान खासदार आहेत. तर मालदा दक्षिणमधून काँग्रेसचे ईशान खान चौधरी खासदार आहेत.

उच्च न्यायालयाने घेतली कठोर भूमिका

मुर्शिदाबादमध्ये उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत २० लोकांचा जीव गेला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने यावर कठोर भूमिका घेतली आहे. न्यायालयाने जिल्ह्यात केंद्रीय दल तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने म्हटले की, आम्ही डोळे मिटून बसू शकत नाही. वेळेत सरकारने पुरेसे पाऊल उचललेले नाही. नागरिकांचे संरक्षण करणे ही राज्याची जबाबदारी आहे. येथे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

मुर्शिदाबाद जळतंय अन् युसूफ पठाण चहा पितोय

यादरम्यान माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण यांची एक इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये पठाण यांनी काही फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये ते निवांत चहा पिताना दिसत आहेत. या पोस्टवर आता सर्व स्तरातून टिका केली जात आहे. हिंसाचार होत असलेला भाग हा पठाण यांच्या मतदारसंघाचा भाग नसला तरी तो जवळपासच आहे. तसेच या राज्यात हिंसाचार होत असताना सत्ताधारी पक्षाच्या खासदाराने केलेली ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. युसूफ पठाण यांनी एका इंस्टाग्राम तीन फोटो शेअर केले आेत. या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले होते की, छान दुपार, चांगला चहा आणि शांत परिसर. या क्षणाचा आनंद घेत आहे. यानंतर लगेच हिंसाचारामुळे मुर्शिदाबाद येथे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काही वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर यावरून टीका करण्यास सुरूवात केली आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, बंगाल जळत आहे. उच्च न्यायालयाने आम्ही याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही असे म्हटले आहे आणि केंद्रीय दल तैनात केले आहे. ममता बॅनर्जी अशा राज्य सरकार पुरस्कृत हिंसाचाराला प्रोत्साहन देत आहेत कारण पोलीस गप्प आहेत. यादरम्यान खासदार युसूफ पठाण चहा पित आहेत आणि हिंदूंची कत्तल होत असताना आनंद घेतात. ही तृणमूल काँग्रेस आहे. पठाण यांनी मात्र अद्याप या टीकेवर प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान डाव्या पक्षांच्या समर्थकांनीही देखील युसूफ पठाण यांच्या या पोस्टवर टीका केली आहे.