संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीची कृषी आयुक्तांकडे मागणी.
सोयाबीनच्या बियाण्यांच्या कंपन्यांच्या प्रत्येक लॉटचे नमुने तपासून बोगस रिपोर्ट आलेल्या सर्वच कंपन्यांवर ताबडतोब लायसन्स रद्द ची कारवाई करावी तसेच सदरील कंपन्यांच्या बियाणे, जात व लॉट नंबर सह प्रसिद्धी माध्यमात सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करावे जेणेकरून एप्रिल, मे मध्ये बियाणे खरे खरेदी करणारे शेतकरी बोगस बियाणे घेण्यापासून वाचतील व त्यांचे होणारे नुकसान टळेल. अशी मागणी संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी कृषी आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली असून प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या राज्यभरात बोगस बियाण्यांचा सुळसुळाट असल्याची चर्चा आहे. त्यातच सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी सुद्धा कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये बोगस खते व बियाणे बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीस आल्याची भीती निर्माण झाली आहे व त्यामुळे अगोदरच आत्महत्या करत असलेला शेतकरी प्रचंड अस्वस्थ झालेला आहे.
कृषी आयुक्त म्हणून स्वतः या गंभीर विषयामध्ये लक्ष घालावे. त्यातल्या त्यात सोयाबीनच्या बियाण्यांच्या कंपन्यांच्या प्रत्येक लॉटचे नमुने तपासून बोगस रिपोर्ट आलेल्या सर्वच कंपन्यांवर ताबडतोब लायसन्स रद्द ची कारवाई करावी. सदरील कंपन्यांच्या बियाणे, जात व लॉट नंबर सह वर्तमानपत्रामध्ये सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करावे. जेणेकरून एप्रिल, मे मध्ये बियाणे खरे खरेदी करणारे शेतकरी बोगस बियाणे घेण्यापासून वाचतील व त्यांचे होणारे नुकसान टळेल. असे म्हटले आहे.
अन्यथा संभाजी ब्रिगेड ला कायदा हातात घेऊन आक्रमक पद्धतीने राज्यभर आंदोलन करावे लागेल असा इशाराही संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडी प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे पाटील शहराध्यक्ष सतिष काळे यांनी दिला आहे.