आज पुणे बालेवाडी येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची आमदार अमित गोरखे यांनी पीडित भिसे कुटुंबासहित भेट घेतली. मुख्यमंत्री साहेबांनी सर्व विषय समजून घेऊन संपूर्ण प्रकरणाविषयी माहिती विचारली व आश्वासित केले की, या प्रकरणात लवकरात लवकर कडक कारवाई केली जाईल. त्याप्रसंगी राज्याचे गृहराज्यमंत्री श्री योगेश कदम उपस्थित होते.