दि .४ ( पीसीबी ) – भाजप आमदार अमित गोरखे यांच्या यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. घडलेल्या संतापजनक प्रकारानंतर आक्रमक झालेले शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या गेटवर धडकले. यावेळी रुग्णालय प्रशासनाला भेटण्याची त्यांच्याकडून मागणी करण्यात येत असताना पोलिसांनी मात्र त्यांना गेटवर अडवल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आणि त्यांच्यात राडा झाला. दरम्यान, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डीन बाहेर येऊन या सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची भेट घेतली अशा प्रकारचा निरोप पोलिसांकडून देण्यात आला. तर दिनानाथ मंगेशकर रूग्णालया समोर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अडवण्यात आल्याने मोठा राडा यावेळी झाला. ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात घोषणाबाजी केली. बघा नेमकं काय घडलं?