सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

0
23

मुंबई, दि. ३ – आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा अजूनही सुरूच आहे. नवे सरकार आल्यापासून सोयीच्या अधिकाऱ्यांना आपल्या खात्यात किंवा जिल्ह्यात बदलण्याची मोहीम सुरू आहे. आता सात बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली आणि नवीन नियुक्तीचे ठिकाणी पुढीलप्रमाणे आहे.


१. डॉ. निधी पांडे (आयएएस: आरआर: २००१) यांची एमएसएसआयडीसी, मुंबई येथील व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
२. श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा (आयएएस: आरआर: २०१२) यांची एमएसआरडीसी, मुंबई येथील संयुक्त व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
३. डॉ. भरत बस्तेवाड (आयएएस: एससीएस: २०१३) सीईओ, जिल्हा परिषद, रायगड यांची एमजीएनआरईजीएस, नागपूर येथील आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
४. डॉ. इंदुराणी जाखर (आयएएस: आरआर: २०१६) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण येथील महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
५. श्रीमती वसुमना पंत (IAS:RR:२०१७) महासंचालक, वनमती, नागपूर यांची नागपूर महानगरपालिका, नागपूर येथे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
६. श्रीमती वैष्णवी बी. (IAS:RR:२०१९) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला यांची नागपूर महानगरपालिका, नागपूर येथे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
७. श्रीमती नेहा भोसले (IAS:RR:२०२०) यांची जिल्हा परिषद, रायगड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.