ते सर्व बोल्ड चित्रपट आता ओटीटी प्लॉटफॉर्मवर

0
9

दि . १७ ( पीसीबी ) – कोरोना काळात थिएटर्स बंद झाल्याने चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित होऊ लागले. पण त्याआधी हा ट्रेंड नव्हता. वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर यायच्या, तर चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित केले जायचे. खरं तर भारतात दरवर्षी शेकडो चित्रपट तयार होतात; यापैकी काही चित्रपट कोणत्याही अडचणींशिवाय प्रदर्शित होतात. तर काहींना मात्र सेन्सॉर बोर्ड बदल करायला सुचवते, त्या बदलानंतरच ते सिनेमे प्रदर्शित होतात.

बोल्ड कंटेंटमुळे सेन्सॉर बोर्डाने बंदी घातलेले अनेक चित्रपट आहेत. असे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करता येत नाहीत. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या सीरिज किंवा चित्रपटांसाठी सेन्सॉर बोर्डाची परवानगी लागत नाही. त्यामुळे बोल्ड कंटेंटमुळे सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित न होऊ शकणारे सिनेमे प्रदर्शित करण्यासाठी आता ओटीटी हा पर्याय आहे. काही बोल्ड कंटेंट व बोल्ड सीन्समुळे चर्चेत राहिलेल्या सिनेमांच्या सिनेमागृहातील प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती, हे चित्रपट आता ओटीटीवर उपलब्ध आहेत. या चित्रपटांची यादी पाहुयात.

अँग्री इंडियन गॉडेस
Angry Indian Goddesses : बोल्ड कंटेंटमुळे या सिनेमावर बंदी घालण्यात आली होती. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर चांगलाच वाद निर्माण झाला होता. लोकांनी या चित्रपटाला विरोधही केला. त्याचवेळी सेन्सॉर बोर्डानेही यावर कात्री चालवली. यानंतर निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला. हा चित्रपट तुम्ही युट्यूबवर पाहू शकता.

जाऊ कहां बता ऐ दिल
Jaoon Kahan Bata Ae Dil : या चित्रपटात खुशबू उपाध्याय, मराठी अभिनेता रोहित कोकाटे, हिमांशू कोहली यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात बोल्ड कंटेंटचा भडिमार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

अनफ्रीडम
Unfreedom on Netflix : ‘अनफ्रीडम’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बोल्ड कंटेंटमुळे बंदी घालण्यात आली होती. नंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला. हा सिनेमा युट्यूबवर पाहता येईल.

गार्बेज
Garbage on Netflix: कौशिक मुखर्जीने दिग्दर्शित ‘गार्बेज’ चित्रपटाची कथा रामी नावाच्या मुलीवर आधारित आहे. चित्रपटात रामीचा बोल्ड एमएमएस लीक होतो, अशी कहाणी आहे. या चित्रपटात भरपूर बोल्ड सीन्स आहेत. या कारणामुळे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला प्रमाणपत्र दिलं नाही. चित्रपटात त्रिमला अधिकारी, शतरुपा दास आणि तन्मय धनिया यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
फायर
Fire on OTT : हा इंडो-कॅनेडियन रोमँटिक ड्रामा चित्रपट १९९६ साली प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये शबाना आझमी आणि नंदिता दास मुख्य भूमिकेत होत्या. समलैंगिक संबंधांवर आधारित या चित्रपटावर भारतात बंदी घालण्यात आली होती. हा चित्रपट यूट्यूब व इतर काही ऑनलाइन वेबसाइटवर पाहता येईल.

लोएव
Loev: दोन गे मुलांच्या लव्ह लाइफवर आधारलेला हा सिनेमा आहे. समलैंगिक संबंधांवर आधारित या चित्रपटात खूप बोल्ड सीन आहे. हा चित्रपट तुम्ही युट्यूबवर पाहू शकता.