शरद पवारांवर दमानिया यांचे गंभीर आरोप

0
4

दि . १६ ( पीसीबी )  – बीडमधील वाढती गुन्हेगारी पाहता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जिल्ह्यातील शांतता-सु्व्यवस्थेवरून गंभीर निरीक्षण नोंदवले.  ‘काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आणि त्याचेच दुष्परिणाम गेले महिने आज बीडमध्ये आपल्याला दिसताहेत’ अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेत शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांना अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

आज पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर दमानिया यांनी घणाघात केला आहे.  शरद पवारांनी धनंजय मुंडेंना आधीच का धडा शिकवला नाही, असा प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केला. तर काल त्यांनी पवारांनी आत्मपरीक्षण करावं असाही सल्ला दिला होता. 

गेल्या काही दिवासांपासून बीडमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. अमानुष मारहाण प्रकरणं अधिक पाहायला मिळत आहेत.  विशेष म्हणजे यामध्ये अनेक पक्षाचे नेत्यांचे निकटवर्तीय कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे दिसते. नुकतच, एका ट्रक ड्रायव्हरला मारण्याचा प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपासून तो ट्रक ड्रायव्हर गायब होता. काल एका शिक्षकाने स्वतःला बँकेसमोर गळफास लावून घेत आपलं जीवन संपवलं. यासर्व प्रकरणावरुन दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेत शरद पवार यांच्यासह सरकारला घेरलं आहे.

 शरद पवारांनी धडा शिकवला असता तर…

अंजली दमानिया आज माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा शरद पवार यांच्या प्रतिक्रियेवर भाष्य केलं आहे.  शरद पवारांना आधी जर नेत्यांना त्यांच्या चूका दाखवल्या असत्या अन् तिथल्या तिथे शरद पवारांनी धडा शिकवला असता तर आज हे सगळं घडताना दिसलं नसतं, असं म्हणत हे संगळ थांबवलं गेलं पाहिजे. 

बीड मधील जितके आमदार आहेत, एक पंकजा मुंडे सोडल्या तर सगळे त्यांच्या पक्षातले होते. शरद पवार यांनी त्यांना काय केलं, त्यांनी काय शिकवलं. 

धनंजय मुंडे असो, संदीप क्षीरसागर असो, सुरेश धस असो, आधीचे जयदत्त क्षीरसागर असो, बजरंग सोनावणे असो, हे सगळेच्या सगळे लोक शरद पवार यांच्याच तालमीत वाढलेत. हे सगळे लोक शरद पवारांच्या गटात होते. त्यांच्याच तालमीत ते मोठे झाले आहेत. बीडची स्थिती गंभीर आहे असं शरद पवार म्हणत असतील तर या सगळ्या गंभीर लोकांना मोठं करण्यामागे तुमचाच हातभार आहे, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

गृहमंत्र्यांनी हे सगळं थांबवलं पाहिजे आणि पहिलं तर पूर्ण बीड पोलीस विभाग आहे त्याला बीड जिल्ह्याच्या बाहेर टाकून सर्व पोलिस स्टाफ नव्यांना आणण्याची गरज आहे आणि तसे निर्देश गृहमंत्र्यांनी द्यावे, अशी त्यांना माझी नम्र विनंती आहे, असं देखील अंजली दमानिया यावेळी म्हणाल्या.

शरद पवार काय म्हणाले होते? 

बीड जिल्ह्याची जी आज अवस्था आहे, ती कधीही नव्हती. बीड जिल्हा सर्वसमावेश असल्याचा माझा अनुभव आहे. माझे सहा-सहा सदस्य आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. सामंजस्याचे वातावरण होते. पण काही लोकांनी सत्तेचा गैरवापर सुरू केला. त्याचेच दुष्परिणाम बीड जिल्ह्यात उमटल्याचे दिसतात. 

राज्य सरकारने कोण आहे, याचा विचार न करता, कायदा हातात घेणारे, वातावरण खराब करणारे, अशांच्या संबंध सक्त धोरण आखण्याची गरज आहे. बीड (BEED) जिल्ह्यात चांगले दिवस कसे येतील, याची काळजी घ्यावी”, असेही शरद पवार यांनी यावेळी म्हटले होते.