चक्क ६० ला टेकलेल्या आमिर खानचे आता हे तिसरे लग्न

0
6

दि . १५ ( पीसीबी ) – नुकतीच बॉलिवूड सुपरस्टार आमिर खाननं साठी गाठली. पण, यंदा आमिर खाननं आपल्या 60व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनवेळी एका गोष्टीचा खुलासा केला आणि सारेच अचंबित झाले. आमिरनं आपली जोडीदार गौरी स्प्रॅटची सर्वांना ओळख करुन दिली. वयाचा साठावा वाढदिवस साजरा करणारा आमिर तिसऱ्यांदा प्रेमात पडलाय, हे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यापूर्वी आमिरची दोन लग्न झालीत आणि दोन्ही लग्न मोडलीत. तर दोन्ही लग्नांपासून त्याला तीन मुलं आहे. नुकतंच आमिरच्या मोठ्या मुलानं बॉलिवूडमध्ये डेब्यू केलाय, अशातच आता पुन्हा आमिर तिसऱ्यांदा प्रेमात पडला असून त्याची त्यानं स्वतः कबुली दिल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
बॉलिवूड सुपरस्टारनं 13 मार्च रोजी मुंबईत मीडियासमोर आपला वाढदिवस साजरा केला आणि त्याचवेळी त्यानं त्याची प्रेयसी गौरीसह अनेक गोष्टींबद्दलही खुलासा केला. जरी आमिर आणि गौरी दोघांचे एकत्र कोणतेही फोटो समोर आलेले नसले, तरीसुद्धा आमिरनं पापाराझींना त्याच्या पर्सनल लाईफचा आदर करण्यास आणि कोणतेही फोटो न काढण्यास सांगितलं आहे. ईटाईम्सच्या वृत्तानुसार, आमिर आणि गौरीचे प्रेमसंबंध साधारणतः एक वर्षांपूर्वी सुरू झाले होते, पण तसं पाहायला गेलं तर, ते एकमेकांना तब्बल 25 वर्षांपासून ओळखतात.

गौरी स्प्रॅट ही मुळची बंगळुरूची आहे आणि सध्या ती आमिर खान फिल्म्समध्ये काम करते. तिचं हेयरड्रेसिंगचं प्रोफेशनल बॅकग्राउंड आहे आणि तिनं यूनिवर्सिटी ऑफ आर्ट्स, लंडनमधून फॅशन, स्टायलिंग आणि फोटोग्राफीमध्ये FDAची पदवी घेतली आहे. गौरीची आई तामिळ आहे आणि वडील आयरिश आहेत. तसेच, तिचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, गौरीला सहा वर्षांचा मुलगासुद्धा आहे.

साठी गाठलेल्या आमिरची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट कोण?
आमिरला बरीच वर्ष ओळखत असूनही गौरीनं त्याचे काही मोजकेच चित्रपट पाहिले आहेत, ज्यात आमिरच्या लगान आणि दंगल या सुपरडुपर हिट चित्रपटांचा समावेश आहे. आमिरनं सांगितलं की, त्याला अजूनही बॉलिवूडच्या वेडेपणाची सवय झाली आहे. आमिरनं असंही सांगितलं की, त्याच्या कुटुंबानं गौरीला मनापासून स्विकारलं आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, गौरीनं अलिकडेच आमिरच्या घरी जेवणाच्या वेळी बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि शाहरुख खान यांचीही भेट घेतली होती.