तेजश्री अडिगे, अश्विनी सातव, टोणगावकर यांचा साहित्य परिषदेकडून गौरव

0
5
दि . 12 ( पीसीबी ) - महाराष्ट्र साहित्य परिषद पिपंरी चिंचवड ने आयोजित केलेल्या महिला दिनानिमित्त महिलांचा ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.त्यावेळी व्यासपीठावर मसापचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, मसाप चे कार्यवाह वि. दा. पिंगळे, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्ष विनीता ऐनापुरे उपस्थित होते.
 विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांमध्ये तेजश्री  अडिगे ( कला क्षेत्र) शोभा जोशी ( साहित्य क्षेत्र) , डॉ . दीपाली टोणगावकर (वैद्यकीय क्षेत्र), अश्विनी सातव ( पत्रकारिता क्षेत्र) ,  स्वाती वितोंडे ( उद्योग क्षेत्र) हर्षा जोशी ( शैक्षणिक क्षेत्र ) सारिका उर्फ माई इंगळे ( सामाजिक क्षेत्र) , विशेष सन्मानार्थी सायली सुर्वे ( संस्कार प्रतिष्ठान) या आठ महिलांचा सन्मानचिन्ह, पुष्प, ग्रंथ व  भेटवस्तू देऊन  विशेष सन्मान करण्यात आला. 

गोडबोले म्हणाल्या महिलांसाठी विविध योजना सुरू झाल्या असल्या तरी त्याची माहिती तळागाळापर्यंत पोहचणे गरजेचे आहे आणि त्यासाठी महिलांनीही जागरूक राहणे गरजेचे आहे.
राजन लाखे यांनी महिला दिनाचा पूर्व इतिहास आणि आजपर्यंतची वाटचाल मांडून मसाप ची भूमिका विषद केली.
कार्यक्रमात स्नेहछाया या आश्रित मुलांच्या संस्थेतील संभाजी या ९ वी च्या मुलाने त्याच्या शैलीत सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या ५२ महिलांचाही मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान करून मसाप पिंपरी चिंचवड च्या वतीने आदर व्यक्त करण्यात आला.
बेडकिहाळ, पिंगळे यांनीही आपल्या मनोगतात महिलांविषयी आदर व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
सुरवातीला गायिका रिचा राजन हिने आपल्या सुरेल आवाजात गणेश वंदन सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
संजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ रजनी शेठ, किरण लाखे, जयश्री श्रीखंडे, श्रीकांत जोशी, किरण जोशी, ऋचा कर्वे, इला पवार, मनीषा फाटक, रेवती साळुंखे, विनीता श्रीखंडे, अर्चना गोरे, प्रांजली मोहिते यांनी सफल संयोजन केले.