दि . 12 ( पीसीबी ) – जिजाऊ ब्रिगेड सारखी संघटना अन्याय अत्याचार विरूद्ध आवाज उठवते, दिन दुबळ्यांना गरजूंना अनाथांना मदत करते.जिजाऊ,सावित्री, अहिल्यामाता यांच्या कार्याचा वारसा जिजाऊ ब्रिगेड पुढे चालवण्याचा प्रयत्न करते असे प्रतिपादन साळुंबरे येथील जीवन अंकुर अनाथ आश्रमाचे संचालक महादेव मुंडे यांनी केले.जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे जिल्हा पदाधिकारी महिलांनी सोमवारी(दि.10)रोजी साळुंबरे येथील जीवन अंकुर अनाथ आश्रमास जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भेट दिली.अनाथ आश्रमातील मुलामुलींशी संवाद साधला.त्यांना जिजाऊ,सावित्री,अहिल्या,रमाई आदी महानायिकांनी प्रतिकूल परिस्थितीत समाजासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली.त्यांना शिक्षणासाठी मदत करून पूर्ण दिवस अनाथ मुलामुलींच्या बरोबर घालवला.या वेळी जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे विभागीय अध्यक्षा सुनिता शिंदे,पुणे जिल्हाध्यक्षा मनिषा हेंबाडे, जिल्हा सचिव वृषाली साठे, उपाध्यक्षा शितल घरत,नीता देशमुख या प्रमुख पदाधिकारी उपस्थित होत्या.आश्रमाच्या संचालिका पार्वती मुंडे यांनी आश्रम करत असलेल्या कार्याची माहिती दिली मुलामुलींची ओळख करुन दिली तसेच आभार मानले.