दि . 12 ( पीसीबी ) – विधानपरिषदेवरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी आज पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक पार पडल्यानंतर कोअर कमिटीच्या नेत्यांची बैठक पार पडेल. हत्या झालेले माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांचे चिरंजीव झिशान यांनी संधी मिळणार असल्याचे समजते
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळत असून लोकसभा व विधानसभा निवडणुकांवेळी अजित पवारांनी काहींना शब्द दिला होता. त्यामुळे, ते नेते सध्या आमदारकीची माळ आपल्याच गळ्यात पडेल अशी आशा बाळगून आहेत. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेत संधी दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, राष्ट्रवादीकडून पक्षात सध्या झिशान सिद्धकी, आनंद परांजपे, सुनील टिंगरे, सुरेश बिराजदार, संजय दौंड आणि सुबोध मोहिते इच्छुक आहेत. मात्र, एकच जागा राष्ट्रवादीची असल्याने कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.