रविंद्र धंगेकर हा पुण्यातील वाल्मिक कराड

0
14

दि. ११ ( पीसीबी ) – काँग्रेस पक्षाला निवडणुकीच्या तोंडावर रामराम करत रविंद्र धंगेकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. धंगेकर सोडून गेल्याने काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अरविंद शिंदेंनी धंगेकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ससून, पब, ड्रग्स हे सगळे आंदोलन त्यांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठीच केले यात कुठेही काँग्रेसचा झेंडा नव्हता. काँग्रेस पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा मोठा दावा केला आहे. हा पुण्यातील वाल्मिक कराड असल्याचं शिंदेंनी म्हटलं आहे.
ज्याची विचारधारा शुन्य त्यावर बोलणार नव्हती, पक्ष कुठच कमी पडला नाही. चारवेळा संधी दिली तरी गेले, मी निवडणूक लढताना त्यांनी विरोध केला होता. पक्षाने ३ वर्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून ४ वेळा संधी दिली. ज्यादिवशी ते आमदार झाले त्यानंतर कधीच पक्षाचा झेंडा हातात घेतला नाही. खालच्या थराला जाऊन राजकारण करणाऱ्या लोकांविषयी बोलणार नाही. त्यांच्या व्यक्तीगत दुष्कारणांसाठी गेले.