लाडकी बहिण योजना आल्यापासून वुद्ध कलाकारांना त्यांचं मानधन नाही

0
59

दि . ८ ( पीसीबी ) – “आज जागतिक महिला दिन आहे. पण महाराष्ट्राची गेल्या काही महिन्यातली अवस्था पाहिली, तर महाराष्ट्रात महिलांवर होणारे अत्याचार देशात सर्वाधिक आहेत. मंत्री त्यात सामील आहेत. सरकारी पक्षाचे लोक सामील आहे. पोलिसांवर दबाव आहे. लाडकी बहिण योजनेसारख्या माध्यमातून 1500 रुपये तुम्हाला दिले म्हणजे महिला सुरक्षित आहेत आणि आम्ही महिलांचे हितरक्षक आहोत. या भूमिकेत जर सरकार असेल तर ते सरकार समस्त महाराष्ट्र आणि महिलावर्गाची फसवणूक करत आहेत” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. “लाडकी बहिण योजना किती फसवी आहे ते आपण निवडणुकीनंतर पाहिलं. निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार होते. आता संबंधित खात्याच्या मंत्री महिला आहेत, त्यांनी ते शक्य नाही सांगितलं, ही महिलांची फसवणूक आहे” असं संजय राऊत म्हणाले.

“मला काल काही वुद्ध कलाकार भेटले. त्यांना दर महिन्याला सरकारकडून काही मानधन मिळतं. त्यांनी मला सांगितलं की, लाडकी बहिण योजना आल्यापासून वुद्ध कलाकारांना त्यांचं मानधन मिळालं नाही. ही आर्थिक अवस्था या राज्याची आहे. आर्थिक पाहणी अहवाल आलाय, त्यावरच बोट दाखवलय. हे राज्य कर्जाच्या ओझ्याखाली चिरडतय. या राज्यामध्ये आर्थिक अराजक माजलं आहे. वृद्ध कलाकार काल माझ्याकडे अक्षरक्ष: रडत होते” असं संजय राऊत म्हणाले.

‘याला देश बोलतात’

“या सरकाने महिलांना 2100 रुपये द्यायचं कबूल केलं आणि आता द्यायला तयार नाही. या योजनेतून पाच लाख महिलांची नाव कापली गेली, मग योजना फसवी नाही का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. चीन, कॅनडा यांनी अमेरिकेविरोधात टॅरिफ वॉर लढण्याचा निर्णय घेतलाय, पण भारत अजून गप्प आहे, या प्रश्नावर राऊत यांनी “याला देश बोलतात, 56 इंचाची छाती बोलतात. युक्रेनच्या जेलेंस्कीसह काही देशांनी ट्रम्पसोबत संघर्ष सुरु केलाय आणि आपण गप्प बसलोय” असं म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी काल 16 लाख कोटीची गुंतवणूक आणली असं सांगितलं, त्यावर संजय राऊत म्हणाले की, “16 लाख कोटी देशात कधी येतात, ते पहाव लागेल. 16 लाख कोटी कागदावर आहेत. हे मोठमोठ आकडे देतात. कृषी क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर आहे, त्याचं श्रेय सरकारने घेऊ नये किंवा कृषी मंत्रालयाने घेऊ नये, याचं श्रेय शेतकऱ्यांच आहे”