‘ऐ खोक्या, माझा तुला ९९ सुद्धा नाही, १०० टक्के आशीर्वाद… ‘; सुरेश धसांची ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल

0
33

दि . ७ ( पीसीबी ) – वाल्मिक कराडनंतर बीडच्या शिरूरचा कुख्यात गुंड आणि आमदार सुरेश धस यांचा खंदा कार्यकर्ता सतीश भोसलेचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यानंतर मोठी खळबळ निर्माण झालीये. क्रूरप्रकारे तो मारहाण करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याचे नवनवीन कारनामे उघड होताना दिसत आहे. सतीश भोसलेला आपण ओळखतो, असेही सुरेश धस यांनी मान्य केले. हेच नाही तर सुरेश धस आणि सतीश भोसले यांचे अनेक फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. पोलिसांनी सतीश भोसले याच्याविरोधात गुन्हाही दाखल केलाय.

आता आमदार सुरेश धस आणि सतीश भोसले यांच्यामधील एक ऑडिओ क्लिप तूफान व्हायरल होताना दिसतंय. ९९ टक्के नाही तर तुझ्यावर शंभर टक्के आर्शिवाद असल्याचे म्हणताना सुरेश धस हे दिसत आहेत. आमदार सुरेश धस यांनी सतीश भोसले याला फोन केल्याचे या क्लिपमधून दिसत आहे. सुरेश धस हे सतीश भोसले याला थेट खोक्या बोलताना दिसत आहेत. सुरेश धस यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.