दि . ७ ( पीसीबी ) – गेल्या काही दिवसांपासून भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. मात्र, त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता तेजस्वी सूर्या यांच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांनी चेन्नईची प्रसिद्ध गायिका आणि भरतनाट्यम नृत्यांगना शिवश्री स्कंदप्रसाद यांच्याशी लग्न केले आहे. बेंगळुरूमध्येच हा विवाह सोहळा पार पडला. पण हा सोहळा अतिशय खासगी ठेवण्यात आला होता.
खासदार तेजस्वी सूर्या यांची पत्नी शिवश्रीने शास्त्र विद्यापीठातून बायोइंजिनियरिंगमध्ये पदवी घेतली आहे. यासोबतच तिने चेन्नई विद्यापीठातून भरतनाट्यममध्ये एमएची पदवी मिळवली आहे. शिवश्रीचे एक यूट्यूब चॅनेल देखील आहे. तिथे तिचे २ लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस्वी सूर्या यांची पत्नी शिवश्री स्कंदप्रसादचे अनेकदा कौतुक केले आहे.