३ कोटी ३८ लाख रुपयांच्या खर्चास निधी मंजूर
इंद्रायणी घाटावरील जीवरक्षकाचा सत्कार
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : राज्य शासनाच्या नमामी चंद्रभागा अभियान अंतर्गत मंजूर झालेल्या इंद्रायणी नदी घाट विकासाचे कामाचे भूमिपूजन आळंदी नगरपरिषद माजी विरोधी पक्षघटनेते, नगरसेवक डी.डी.भोसले पाटील यांचे हस्ते भूमिपूजन, पूजा, श्रीफळ वाढवीत उत्साहात करण्यात आली.
या भूमिपूजन प्रसंगी प्रशासक तथा मुख्याधिकारी कैलास केंद्रे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, संजय घुंडरे, प्रशांत कुऱ्हाडे, रोहिदास तापकीर, सचिन गिलबिले, दिनेश घुले, प्रकाश कुऱ्हाडे,आनंदराव मुंगसे, अर्जुन मेदनकर, रामदास दाभाडे, आशिष गोगावले, संजय वडगावकर, सतीश कुऱ्हाडे, अभियंता संजय गिरमे, सचिन गायकवाड, प्रसाद बोराटे, अमित घुंडरे, विभाग प्रमुख विष्णुकुमार शिवशरण, बाळासाहेब पेटकर, सागर भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी येथील केलेल्या विविध विकास कामांची माहिती देत इंद्रायणी नदी परिसर विकास कामाची माहिती देत संवाद साधला. घाटाचे विकासाचे कामाचा आदेश देण्यात आला असून दिलेल्या आदेशा प्रमाणे तसेच मंजूर निविदे प्रमाणे कामकाज सुरु होत आहे. प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्याचे आळंदी नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.
आळंदी येथे अस्तित्वात असलेल्या इंद्रायणी नदी घाटाचा जुन्या पुला नजिक असलेला भाग अनेक वर्षांपासून अपूर्ण तसेच काटेरी झुडूपांनी व्यापलेला होता. आषाढी वारी दरम्यान मोबाईल टॉयलेट ची पाहणी करताना मुख्याधिकारी केंद्रे यांच्या निदर्शनास आल्या नंतर त्यांनी यासाठी पाठपुरावा करीत घाटाचे विकासाचे काम आता सुरु करण्यात आल्याचे सांगितले. यामुळे अनेक वर्ष वापरा विना पडून असलेल्या जागेचा वापर भाविकांना दर्शनास जाण्यासाठी घाटाची अतिरिक्त जागा उपलब्ध होत आहे. अपूर्ण जागेत घाट बांधकामाचा परिपूर्ण प्रस्ताव मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी पुणे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षते खालील नमामी चंद्रभागा अभियानाच्या कृती समितीस दिला होता. त्या प्रमाणे या विकास कामास ३ कोटी ३८ लाख रुपयांच्या खर्चास निधी मंजूर करून शासकीय नियमा नुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आळंदीतील एस.टी.पी. प्रकल्पाचे काम देखील सुरु कारण्यातआले आहे. यामुळे आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीचे दुतर्फ़ा सांडपाणी वाहू नलिका काम पूर्ण होताच येतुन वाहणाऱ्या नदीत दूषित पाणी जाणार नाही. यामुळे आळंदी शहरातील सांडपाणी नदी जाणार नाही. यातून नदीचे पावित्र्य जोपासले जाणार आहे. स्काय वॉक लगतचे चांभार घाटाचे कामाच्या हि म चामर ल्क या विकास कामाचे भूमिपूजन प्रशासक तथा मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या समवेत माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील यांचे प्रमुख हस्ते झाले. यावेळी आनंदराव मुंगसे, संजय घुंडरे, डी.डी. भोसले पाटील आदींनी मनोगते व्यक्त करीत आळंदीतील विकास कामाची माहिती दिली. मुख्याधिकारी केंद्रे यांनी आळंदीत विविध विकासाची कामे मार्गी लावल्या बद्दल या भूमिपूजनाच्या त्यांचे वर कौतुकांचा शब्ध सुमनांनी वर्षाव झाला. यावेळी इंद्रायणी नदी घाटावर जीव रक्षकाचे काम करणाऱ्या शिवशक्ती लोकरे या सेवकाचा सत्कार करण्यात आला.